देशभरात सूर्यग्रहण पाहण्यासाठी उत्साह दिसत होता. दशकातील शेवटचं सूर्यग्रहण पाहण्यासाठी पंतप्रधान मोदींनी देखील तयारी केली होती. सूर्यग्रहण पाहण्यासाठी केलेल्या तयारी बाबतची माहिती पंतप्रधान मोदींनी ट्विटद्वारे दिली. या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींचे काही खास कँडिड फोटोदेखील होते. मोदींनी फोटो ट्विट केल्यानंतर काही वेळेतच एका युजरनं आता याच्यावर मीम्स बनणार असं ट्विट केलं.
यावर पंतप्रधान मोदी यांनी हजरजवाबीपणा दाखवत तुमचं स्वागत आहे...एन्जॉय करा! असं ट्विट केलं.
आता तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच परवानगी दिली. मग कोण थाबतंय. नेटकरी झाले ना सुरू आणि एक से एक मिम्स युजर्सनी ट्विट केले आहेत.
हेही वाचा