Advertisement

मंत्रीमंडळ विस्तारात घटक पक्षांनाही मंत्रीपदं ?

महाविकास आघाडी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार सोमवारी ३० डिसेंबरला होणार आहे. या विस्तारात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आघाडीसोबत राहिलेल्या घटक पक्षांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

मंत्रीमंडळ विस्तारात घटक पक्षांनाही मंत्रीपदं ?
SHARES

महाविकास आघाडी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार सोमवारी ३० डिसेंबरला होणार आहे. या विस्तारात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आघाडीसोबत राहिलेल्या घटक पक्षांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. भाजपाला अनुकूल वातावरण असतानाही घटक पक्षांनी काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ सोडली नाही. त्यामुळे याची बक्षिसी मंत्रीपद रुपात घटक पक्षांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

महाआघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादीसह स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, प्रहार संघटना आणि शेतकरी कामगार पक्ष आदी पक्षांचा समावेश होता. या पक्षांच्या नेत्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. घटक पक्षांच्या मंत्रीपदांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार सकारात्मक असल्याचं सांगितलं जात आहे. शेकापचे जयंत पाटील, बच्चू कडू, राजू शेट्टी, अबू आझमी यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाला अनुकूल वातावरण होते. मात्र, तरीही या घटक पक्षांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडली नव्हती. भाजपाने अजित पवारांच्या मदतीने सरकार स्थापन केल्यानंतरही बच्चू कडू यांनी शिवसेनेला आपला पाठिंबा दिला होता. तर शेकापमुळे आघाडीला अनेक जागांवर फायदा झाला आहे. राजू शेट्टी आघाडीत सामील झाले होते. पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी आघाडीला दोन्ही निवडणुकीत विनाअट पाठिंबा दर्शविला होता. 



हेही वाचा -

दोनच्या आत शपथविधी उरका, राजभवनकडून राज्य सरकारला सूचना

धनंजय मुंडे यांना मंत्रीपद नाही? 'हे' आहे कारण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा