दोनच्या आत शपथविधी उरका, राजभवनकडून राज्य सरकारला सूचना

अवघ्या एका तासात ३० मंत्र्यांचा शपथविधी कसा आटोपायचा असा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

SHARE

सरत्या वर्षाच्या अखेरीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. येत्या ३० डिसेंबर रोजी हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.  मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमासाठी राज्य सरकारकडून दुपारी १ ही वेळ राजभवनाकडे मागण्यात आली होती. परंतू, मंत्रिमंडळ विस्ताराचा हा कार्यक्रम दुपारी दोनच्या आतच उरकण्यात यावा अशा सूचना राजभवाने राज्य सरकारला दिल्याचे कळते.

हेही वाचाः धनंजय मुंडे यांना मंत्रीपद नाही? 'हे' आहे कारण

सत्ताधारी पक्षाच्या मागणीनुसार त्यांना शपथविधीसाठी वेळ दिली जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांच्या शपथविधीसाठीसुद्धा त्यांनी सुचवलेली वेळच देण्यात आली होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्र्यांचा शपथविधीसाठी दुपारी एकची वेळ मागणारे पत्र राज्यपाल कार्यालयाला मिळाले आहे. सरकारच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांच्या शपथविधीची संख्या पाहता, वेळ फार कमी आहे. अवघ्या एका तासात ३० मंत्र्यांचा शपतविधी कसा आटोपायचा असा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

हेही वाचाः लवकरच मिळणार १० रुपयांत थाळी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानेतृत्वाखाली चालणाऱ्या सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस अशा तीन पक्षांचे जवळपास ३० आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे समजते. यामध्ये शिवसेनेचे ११. एनसीपीचे ११ आणि कॉंग्रेसचे ८ मंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मंत्रीपदच्या वाटपानुसार, ४२ पैकी शिवसेनेला १५, एनसीपीला १६ आणि कॉंग्रेस पक्षाला १२ मंत्रिपदं मिळू शकतात.

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या