Advertisement

धनंजय मुंडे यांना मंत्रीपद नाही? 'हे' आहे कारण

महाविकास आघाडी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार ३० डिसेंबरला होणार आहे. या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता दिसत नाही.

धनंजय मुंडे यांना मंत्रीपद नाही? 'हे' आहे कारण
SHARES

महाविकास आघाडी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार ३० डिसेंबरला होणार आहे. या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता दिसत नाही. याचं कारण म्हणजे पक्षनेतृत्वाने त्यांच्याबाबत वेगळा विचार केला असल्याचं बोललं जात आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्याची शक्यता आहे. 

काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं समजतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून दुसरा प्रदेशाध्यक्ष नियुक्त केला जाईल. यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव आघाडीवर आहे. त्यांच्या नावाला पक्षातील अनेकांची पसंती आहे.  राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते धनंजय मुंडे यांची ओळख आहे. परळीतल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या लढाईत त्यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करत प्रथमच विधानसभेत प्रवेश केला. 


काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण? 
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे काँग्रेसही नवीन प्रदेशाध्यक्ष नियुक्त करणार आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे.  पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रात काँग्रेसचं नेतृत्त्व करावं, अशी इच्छा खुद्द काँग्रेस हायकमांडचीच असल्याचं सांगितलं जात आहे. 



हेही वाचा -

मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मिळाला मुहुर्त, 'या' दिवशी होणार विस्तार

अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलं उत्तर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा