Advertisement

अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलं उत्तर

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा शिवसेनेला उत्तर दिलं आहे.

अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलं उत्तर
SHARES

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा शिवसेनेला उत्तर दिलं आहे. अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर पिंपरीत शिवसेनेकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं होतं. जोडे मारण्यात आलेल्या पोस्टरवर अमृता फडणवीस यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो होता. राघोबादादा जरा आनंदीबाईला आवरा अशा घोषणा यावेळी शिवसैनिकांनी दिल्या. 

अमृता फडणवीस यांनी या आंदोलनाचा व्हिडीओ ट्विट करत लिहिलं की, तुम्ही लोकांना मारहाण करत नेतृत्व करु शकत नाही. हा हल्ला आहे, नेतृत्त्व नाही.  दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे ! असा शेरही अमृता यांनी ट्विट केला. 

अमृता फडणवीस यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ठाकरे आडनाव असले तरी कोणी ठाकरे होत नाही. कुटुंब आणि सत्तेपलीकडे जाऊन लोकांसाठी प्रामाणिक काम करावे लागते, असं ट्विट अमृता यांनी केलं होतं.


हेही वाचा -

शिवसेनेचे गुंड दहशत माजवत आहेत - किरीट सोमय्या

सचिन तेंडुलकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा