Advertisement

सचिन तेंडुलकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलरकरने मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

सचिन तेंडुलकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला
SHARES

दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलरकरने मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सचिन तेंडुलकरसोबत माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकरही  होते. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं समजतं.


उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेही उपस्थित होते. पुष्पगुच्छ देऊन सचिन आणि सुनील गावसकर यांचे स्वागत करण्यात आले. जवळपास दोघेही मातोश्रीवर तासभर उपस्थित होते. या सदिच्छा भेटीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र,  तासभर झालेल्या चर्चेमध्ये मुंबई क्रिकेटबाबत नक्की चर्चा झाल्याची शक्यता आहे. हेही वाचा -

बाळासाहेब ठाकरे यांच्या दक्षिण मुंबईतील पुतळ्याला विरोध

राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर?
संबंधित विषय
Advertisement