Advertisement

बाळासाहेब ठाकरे यांच्या दक्षिण मुंबईतील पुतळ्याला विरोध

दक्षिण मुंबईतील जागतिक वारसा असलेल्या भागात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारू नये, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दक्षिण मुंबईतील एका रहिवासी संघटनेने केली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या दक्षिण मुंबईतील पुतळ्याला विरोध
SHARES

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दक्षिण मुंबईत उभारण्यात येणारा पुतळा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए) समोर प्रस्तावित आहे. दक्षिण मुंबईतील जागतिक वारसा असलेल्या भागात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारू नये, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दक्षिण मुंबईतील एका रहिवासी संघटनेने केली आहे. 

फेडरेशन ऑफ रेसिडेंट ट्रस्ट्स (फोर्ट) या संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. फेडरेशन ऑफ रेसिडेंट ट्रस्ट्स (फोर्ट) ही संघटना ओव्हल कुपरेज रेसिडेंट असोसिएशन (ओसीआरए), नरिमन पॉइंट चर्चगेट सिटीझन असोसिएशन (एनपीसीसीए) आणि ओव्हल ट्रस्ट या संघटनांनी शिखर संघटना आहे.  ज्या ठिकाणावर बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारला जाणार आहे, ते ठिकाण युनेस्को जागतिक वारशांच्या यादीत येते. या कारणामुळे मुख्यमंत्र्यांनी या पुतळ्यासाठी योग्य पर्यायी जागा शोधावी, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे. 

या ठिकाणाहून  गेट वे ऑफ इंडियाकडे जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे येथे नेहमी वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी होत असते.  पुतळ्याची नियोजित जागा आणि पुतळ्याची उंची पाहता, या चौकातील वाहतुकीच्या नियमनावर लक्ष ठेवण्यात मोठे अडथळे निर्माण होतील, असं पत्रात म्हटलं आहे. नियोजित ठिकाणी पुतळा उभारला गेल्यास जागतिक वारसा यादीत समावेश असलेल्या या परिसराचे मूळ रूप बदलणार आहे, अशी प्रतिक्रिया एनपीसीसीएचे अध्यक्ष स्वार्न कोहली यांनी दिली आहे. 

दरम्यान, जागतिक वारसा असलेल्या ठिकाणी बाळासाहेबांचा पुतळा उभारू नये या तर्काला काहीएक अर्थ नसल्याचे, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्हटलं आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले सामाजिक कार्य नेहमीच लोकांच्या डोळ्यापुढे राहिले पाहिजे. याच कारणामुळे नियोजित जागी हा पुतळा उभारणे योग्य ठरेल, असं जाधव यांनी म्हटलं. 



हेही वाचा -

राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर?

राज्यात लवकरच ५० शिवभोजन केंद्रावर १० रुपयात जेवण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा