Advertisement

शिवसेनेचे गुंड दहशत माजवत आहेत - किरीट सोमय्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला सोमवारी वडाळा येथे शिवसैनिकांनी मारहाण केली.

शिवसेनेचे गुंड दहशत माजवत आहेत - किरीट सोमय्या
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला सोमवारी वडाळा येथे शिवसैनिकांनी मारहाण केली. या मारहाणीचा निषेध करत शिवसेनेचे गुंड मुंबईत दहशत माजवत आहेत, असा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांना तात्काळ अटक करा, अशीही मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी मारहाण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर वडाळा येथील राहुल उर्फ हिरामण तिवारी याने फेसबुकवर पोस्ट लिहून टीका केली. त्यामुळे भडकलेल्या शिवसैनिकांनी तिवारी याला मारहाण करत त्याचं मुंडण केलं होतं.

सोमय्या यांनी मंगळवारी वडाळा येथे जाऊन तिवारी कुटुंबीयांची भेट घेतली. सोमय्या यांनी वडाळा पोलीस ठाण्यात जाऊन शिवसैनिकांच्या अटकेची मागणी केली. त्यांनी शिवसेनेवर टीका केली. शिवसेनेचे गुंड निष्पाप नागरिकांमध्ये दहशत पसरवत आहेत. मात्र, पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. हिरामणला जाहीरपणे मारहाण झाली आहे. मारहाण करणारे टीव्हीवर स्पष्ट दिसत आहेत. असं असूनही काहीही कारवाई होत नाही, असंही सोमय्या म्हणाले.



हेही वाचा -

सचिन तेंडुलकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

बाळासाहेब ठाकरे यांच्या दक्षिण मुंबईतील पुतळ्याला विरोध




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा