Advertisement

मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मिळाला मुहुर्त, 'या' दिवशी होणार विस्तार

महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहुर्त मिळाला आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मिळाला मुहुर्त, 'या' दिवशी होणार विस्तार
SHARES

महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहुर्त मिळाला आहे. ३०डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्रिपद आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री म्हणून शपथ घेतील. 

महाविकासआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची उत्सुकता तिन्ही पक्षाच्या नेत्यांना होती. हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होता. मात्र, काँग्रेसकडून मंत्रिपद कुणाला द्यायचे याची यादी निश्चीत होत नव्हती. त्यामुळे हा विस्तार पुढे ढकलण्यात आला होता. शपथविधी सोहळा विधिमंडळाच्या प्रांगणात होणार आहे.  या सोहळ्यात उपमुख्यमंत्रिपद आणि महत्वाचे नेते मंत्री म्हणून शपथ घेणार असल्याने सोहळा भव्यदिव्य करण्यावर भर देण्यात आला आहे.


तीनही पक्षांची संभाव्य नावे

काँग्रेस

१) के सी पाढवी

२) अमित झनक

३) यशोमती ठाकूर

४) अशोक चव्हाण

५) अमीन पटेल

६) अमित देशमुख

७) प्रणिती शिंदे

८) पृथ्वीराज चव्हाण

९) सतेज पाटील

१०) विश्वजीत कदम

11) जोगेंद्र कवाडे मित्रपक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस

१) अजित पवार

२) अनिल गोटे

३) धर्मराव बाबा आत्राम

४) राजेश टोपे

५) नवाब मल्लिक

६) अदिती तटकरे

७) संग्राम जगताप

८) हसन मुश्रीफ

९) अनिल देशमुख

१०) इंद्रनिल नाईक

11) राजू शेट्टी/जयंत पाटील(शेकाप)

शिवसेना

१) गुलाबराव पाटील

२) दादा भुसे

३) संजय रायमूलकर

४) बचू कडू (प्रहार)

५) राहुल पाटील

६) प्रदीप जेसवाल

७) श्रीनिवास वनगा

८) रवींद्र वायकर/ सुनील राऊत

९) तानाजी सावंत

१०) शंभूराजे देसाई

११) भास्कर जाधव

१२) दीपक केसरकर

१३) प्रकाश अबीटकर

१४) आशिष जयस्वाल

१५) संजय राठोड



हेही वाचा -


अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलं उत्तर


शिवसेनेचे गुंड दहशत माजवत आहेत - किरीट सोमय्या




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा