राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भुजबळ, अजित आणि रोहित पवारांना उमेदवारी

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनंही त्यांची ७७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणं, रोहित पवार यांच्यासह माणिकराव कोकाटे यांनाही तिकीट देण्यात आले आहे.

पहिली यादी

राष्ट्रवादीनं जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत येवल्यामधून छगन भुजबळ, घनसावंगीतून राजेश टोपे, सिन्नरमधून माणिकराव कोकाटे, मुंब्रा-कळवामधून जितेंद्र आव्हाड, विक्रोळीतून माजी नगरसेवक धनंजय पिसाळ, दिंडोशीतून विद्या चव्हाण, अणुशक्तीनगरमधून नवाब मलिक, बारामतीतून अजित पवार, आंबेगावमधून दिलीप वळसे-पाटील, श्रीवर्धन येथून अदिती तटकरे, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार, परळीतून धनंजय मुंडे, इस्लामपूरमधून जयंत पाटील आणि तासगाव कवठे महांकाळमधून सुमन आर. पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

उमेदवाराची घोषणा

दरम्यान, राष्ट्रवादीनं मुंबईतल्या वरळी मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा अद्याप केलेली नाही. या मतदारसंघातून शिवसेना नेते आदित्य ठाकरे निमडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र, त्यांच्याविरोधातील वरळीच्या उमेदवारांचं नाव राष्ट्रवादीनं जाहीर न केल्यानं राष्ट्रवादीच्या वरळीतील उमेदवाराबाबतचं गूढ वाढलं आहे.


हेही वाचा -

वरळीतील 'केम छो वरळी’ फ्लेक्स अखेर उतरवले

आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीला राज ठाकरेंचा पाठिंबा


पुढील बातमी
इतर बातम्या