ईडीच्या समन्सनंतर देशमुख गायब?, स्वत:च केला खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांंची अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) भ्रष्टाचार प्रकरणात झाडाझडती केली जात आहे. मात्र चौकशीचं समन्स बजावूनही देशमुख त्याला प्रतिसाद देत नसल्याने ते चौकशीला बगल देत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यावर अनिल देशमुख यांनी खुलासा केला आहे.

ईडीने माझ्या कुटुंबियांची ४ कोटींची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. ४ कोटी रुपयांच्या जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये माझ्या मुलाने २ कोटी ६७ लाखामध्ये २००६ मध्ये जी जमीन घेतली होती. ती २ कोटी ६७ लाखाची जमीन सुद्धा जप्त केलेली आहे. मात्र ३०० कोटीची असल्याचं सांगून काहीजण गैरसमज पसरवत आहेत. मला ईडीचा समन्स आला होता. समन्स आल्यानंतर मी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. कोर्टाचा जो काही निकाल येईल. त्यानंतर मी ईडीसमोर माझं स्टेटमेंट देईन, असा खुलासा अनिल देशमुख यांनी केला आहे.

हेही वाचा- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी ईडीचा छापा

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ईडीने देशमुख यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. रविवारीही त्यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले. अनिल देशमुख यांना आतापर्यंत तीन वेळा समन्स बजावण्यात आलेलं आहे. मात्र, तीनही वेळा अनिल देशमुख यांनी चौकशीला जाणं टाळलं. देशमुख यांच्या पत्नी व मुलालाही ईडीकडून समन्स बजावण्यात आलेलं आहे. 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. अनेक अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या ते भ्रष्ट मार्गाने करत होते, असे आरोप अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आले आहेत.

शंभर कोटींचं वसुली प्रकरण आणि बदल्यांसाठी पैसे घेण्यात आल्याच्या आरोपांत तथ्य असेल तर या पैशाचं नेमकं झालं? काय याचा तपास ईडी करत आहे. या पैशांचा वापर कसा करण्यात आला, हवाला मार्फत ते बाहेर पाठवण्यात आले आहेत का? किंवा कोलकात्यातील शेल कंपन्यांच्या माध्यमातून त्याची गुंतवणूक केली गेली आहे का? याचा तपास ईडी करत असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा- मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम सुरू, अनिल देशमुखांचा केंद्रावर खळबळजनक आरोप
पुढील बातमी
इतर बातम्या