गणेश नाईक यांचा ४८ नगरसेवकांसह भाजपात प्रवेश

नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडलं आहे. नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी मंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्याबरोबर त्यांचे पुत्र माजी खासदार संजय नाईक आणि ४८ नगरसेवकांनीही भाजपाची वाट धरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. 

गणेश नाईक यांचे दुसरे पुत्र संदीप नाईक आणि पुतण्या सागर नाईक यांनी मागील महिन्यात भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी गणेश नाईकही भाजपात प्रवेश करतील असं बोललं जात होतं. मात्र भाजपा प्रवेशाचा मुहुर्त निश्चीत होत नव्हता. अखेर बुधवारी त्यांनी ४८ नगरसेवकांसह कमळ हाती घेतले. त्यांच्या भाजपा प्रवेशाने नवी मुंबई पालिकेतील  राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ताही संपुष्टात येणार आहे. पालिकेत आता भाजपाची सत्ता असेल. 


हेही वाचा -

हर्षवर्धन पाटील यांचा भाजपात प्रवेश

येत्या २-३ दिवसांत विधानसभा निवडणुकीची घोषणा?


पुढील बातमी
इतर बातम्या