Advertisement

येत्या २-३ दिवसांत विधानसभा निवडणुकीची घोषणा?

महाराष्ट्र, हरयाणा या राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा येत्या २ ते ३ दिवसांत जाहीर होण्याची शक्यता केंद्रीय निवडणूक आयोगा (EC)तील सूत्रांनी वर्तवली आहे.

येत्या २-३ दिवसांत विधानसभा निवडणुकीची घोषणा?
SHARES

महाराष्ट्र, हरयाणा या राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा येत्या २ ते ३ दिवसांत जाहीर होण्याची शक्यता केंद्रीय निवडणूक आयोगा (EC)तील सूत्रांनी वर्तवली आहे. सर्वात आधी महाराष्ट्र त्यानंतर हरयाणात आणि पाठोपाठ झारखंडमध्ये निवडणुका होतील, असं म्हटलं जात आहे.

निवडणूक आयुक्तांशी चर्चा

महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम निश्चित करण्याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्यानंतर बुधवारी आयोगाच्या पथकाने हरयाणात जाऊन तेथील मुख्य निवडणूक आयुक्तांशी चर्चा केली. दोन्ही राज्यांच्या गृह विभागांशी तसंच केंद्रीय गृह मंत्रालयाशीही चर्चा करून सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. त्यावरून येत्या २ ते ३ दिवसांत निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 दिवाळीआधी पूर्ण प्रक्रिया

२०१४ मध्ये या दोन्ही राज्यांतील निवडणुकांची घोषणा २० सप्टेंबर रोजी करण्यात आली होती. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी मतदान आणि १९ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचे निकाल लागले होते. २३ ऑक्टोबर रोजी दिवाळी होती. २०१४ मध्ये नक्षलग्रस्त झारखंडच्या निवडणुका २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या दरम्यान ५ टप्प्यांत झाल्या होत्या.  

महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन्ही राज्यांतील मतदान व मतमोजणी प्रक्रिया दिवाळीआधी पूर्ण करण्यात येणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.



हेही वाचा-

‘वंचित’ला ‘आप’चा साथ?, अधिकृत घोषणेची लवकरच शक्यता

शेवटच्या कॅबिनेटमध्ये ३७ मोठे निर्णय, निवडणुका डोळ्यापुढे ठेवून निर्णयांचा धडाका



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा