मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना मुदतवाढ

भारताने काश्मिरमधील 370 कलम हटवल्यामुळे आधिच तणावाचे वातावरण असताना. निवडणूकीच्या पाश्वभूमिवर कोणताही अनुच्चित प्रकार महाराष्ट्रासह देशाची आर्थिक राजधानी मुंबईत होऊ नये. या अनुशंगाने संजय बर्वे यांना मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सूञांनी दिली आहे.

SHARE

काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये.  या अनुशंगाने मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना तीन महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश मंगळवारी गृहखात्याकडून जारी होतील. संजय बर्वे हे 31 आँगस्ट रोजी सेवा निवृत्त होणार होते. 

नोव्हेंबरपर्यंत बर्वेच आयुक्त


अत्यंत कडक शिस्तीचे  आणि स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी म्हणून मुंबई पोलिस आयुक्त म्हणून संजय बर्वे हे ओळखले जातात. माजी पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची पोलिस महासंचालकपदी निवड झाल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्तपदी  बर्वे यांची निवड करण्यात आली. माञ सहा महिन्यांनी बर्वे हे सेवा निवृत्त होणार होते. अत्यंत कमी काळात बर्वे यांनी आयुक्त पदाची धूरा अत्यंत उत्कृष्ठ रित्या संभाळली. 31 आँगस्ट रोजी बर्वे हे निवृत्त होणार असल्यामुळे मुंबई पोलिस आयुक्त पदाची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी अनेक दिग्गज आयपीएस वरिष्ठ अधिकार्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली होती. माञ भारताने काश्मिरमधील 370 कलम हटवल्यामुळे आधिच तणावाचे वातावरण असताना. निवडणूकीच्या पाश्वभूमिवर कोणताही अनुच्चित प्रकार महाराष्ट्रासह देशाची आर्थिक राजधानी मुंबईत होऊ नये. या अनुशंगाने  संजय बर्वे यांना मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सूञांनी दिली आहे.


अमराठी अधिकाऱ्यांचा बर्वेंना विरोध


मुंबई पोलिस आयुक्त पदाची माळ बर्वे यांच्या गळ्यात पडल्यानंतर अनेक अमराठी अधिकाऱ्यांच्या पोटात दुखू लागले होते. बर्वेंना डावलून काही पोलिस अधिकाऱ्यांनी एटीएसमध्ये जाण्याची इच्छा थेट पोलिस महासंचालकांकडे केल्यानंतर हा वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर बर्वे यांना
मुदतवाढ मिळू नये. यासाठी याच अमराठी अधिकाऱ्यांनी लाँबिग देखील केली होती.  त्यानंतरही मुख्यमंञ्यांनी स्वच्छ प्रतिमेचे आणि कडक शिस्तीच्या संजय बर्वे यांच्यावर अन्याय होऊ न देता. बर्वे यांना नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. लवकरच गृहखात्याकडून बर्वे यांच्या मुदतवाढीचे आदेश जारी केले जाणार असल्याची माहिती सूञांनी दिली आहे.

संजय बर्वे यांची कारकिर्द


मुंबई पोलिस आयुक्तपदी 1987 बॅचचे आयपीएस अधिकारी संजय बर्वे आहेत. संजय बर्वे हे याआधी राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. मुंबई पोलिसआयुक्त पदाच्या शर्यतीत असलेल्या अनेकांनी मुंबई पोलिस आयुक्तपदाच्या शर्यतीत बर्वेंसह अनेक दिग्गज्जांची नावं होती. आयुक्त पदासाठी अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या मनात घर करण्याचा प्रयत्न केला. मात्र पालघर पोटनिवडणुकीत भाजप विजयी होणार असल्याचा अचूक अहवाल सादर करत बर्वे यांनी मुख्यमंत्र्यांचं मन जिंकलं. अत्यंत हुशार आणि शिस्तप्रिय अशी बर्वे यांची ओळख आहे.
संबंधित विषय
ताज्या बातम्या