‘वंचित’ला ‘आप’चा साथ?, अधिकृत घोषणेची लवकरच शक्यता

वंचितने आता दुसरा जोडीदार शोधण्यास सुरूवात केली आहे. आम आदमी पक्षा (Aam Aadmi Party) च्या रुपाने वंचितला कदाचित हा दुसरा जोडीदार मिळू शकतो.

SHARE

जागा वाटपावरून बिनसल्यामुळे येऊ घातलेली विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि एमआयएम (AIMIM) स्वबळावर लढणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. ‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे वंचितने आता दुसरा जोडीदार शोधण्यास सुरूवात केली आहे. आम आदमी पक्षा (Aam Aadmi Party) च्या रुपाने वंचितला कदाचित हा दुसरा जोडीदार मिळू शकतो. 

बैठक सकारात्मक

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) तसंच प्रमुख पदाधिकाऱ्यांची ‘आम आदमी पक्षा’च्या पदाधिकाऱ्यांसोबत सोमवारी दादरमधील आंबेडकर भवन इथं बैठक झाली. या बैठकीत दोन्ही पक्षांमध्ये येणारी विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याच्या दृष्टीने बोलणी झाल्याचं समजत आहे. ही बोलणी बऱ्यापैकी यशस्वी झाल्याने वंचितला ‘आप’चा साथ मिळू शकतो, असं म्हटलं जात आहे.

केजरीवालही तयार

शिवाय ‘आप’चे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे देखील महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीसोबत मिळून विधानसभा निवडणूक (Vidhan sabha election 2019) लढवण्यास तयार असल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांमध्ये आणखी एक बैठक अपेक्षित असून या बैठकीनंतर दोन्ही पक्षांकडून आघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे. हेही वाचा-

‘आरएसएस’च्या लोकांमुळे आमची युती तुटली- जलील

काँग्रेससाेबत युती नाहीच, स्वबळावर लढवणार निवडणूक - प्रकाश आंबेडकरसंबंधित विषय
ताज्या बातम्या