ताेंड सांभाळून बोला! आव्हाडांचा पडळकरांना इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जी भाषा वापरली आहे, त्याचा मी तीव्र निषेध करतो. गोपीचंद पडळकर हे फार मोठ्या उंचीचे नेते आहे. मात्र उंचीच्या नेत्यांचा कधीकधी तोल ढासळतो. शरद पवार यांच्याबद्दल असं बोलायची महाराष्ट्रातील विरोधकांची देखील हिंमत झाली नाही. त्यामुळे गोपीचंद पडळकरांनी जरा तोंड सांभाळून बोललं तर बरं होईल, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

धुळीची लायकी नाही

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य पडळकर यांनी पंढरपूर इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं होतं. यावर एकावृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने त्यांच्यावर टीका करावी हे हास्यास्पद आहे. क्षणभर प्रसिद्धीसाठी कुठल्याही थराला जायचं हे काम भाजपच्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत केलं. तेच आता पडळकर करत आहेत. 

हेही वाचा - शरद पवार महाराष्ट्राला लागलेले कोरोना, गोपीचंद पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य

धनगरांचा विश्वासघात

कधीकाळी पंतप्रधान मोंदीवर टीका करणाऱ्या माणसाने आता त्याच मोदींकडून आमदारकी घेतली. पडळकर राष्ट्रवादीच्या वाटेवरही होते. ६-८ महिन्यापूर्वी मला पक्षात घ्या म्हणून पडळकर राष्ट्रवादीचे दरवाजे ठोठावत होते. त्यासाठी कितीवेळा राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतली होती. आता भाजपमध्ये जाऊन बहुजनांच्या गोष्टी आम्हाला शिकवताहेत. भाजपसारख्या मनुवादी पक्षात बहुजनांचा नेता काय करतोय? ज्या पक्षाने आजपर्यंत जातीवाद पाळला, धर्मद्वेष पाळला, त्या पक्षात पडळकर कसे? खरं तर त्यांनीच धनगरांचा विश्वासघात केला आहे, अशा शब्दांत आव्हाड यांनी हल्ला चढवला.  

बहुजनांचं राजकारण

शरद पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण करत आहेत. पण या काळात त्यांनी बहुजन समाजाला झुलवत ठेवून केवळ राजकारण केलं. बहुजन समाजाला कधीही पुढं येऊ दिलं नाही. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. त्यामुळे पवार हे धनगर आरक्षणावर पॉझिटिव्ह असतील असं वाटत नाही. खरं तर पवार यांची कुठलीही विचारधारा नाही, अजेंडा नाही आणि व्हिजनही नाही. , अशी टीका पडळकरांनी शरद पवारांवर केली होती.

हेही वाचा - म्हणजे राज्यात सर्कस असल्याचं शरद पवारांना मान्य- चंद्रकांत पाटील
पुढील बातमी
इतर बातम्या