राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याचा पराक्रम, जेसीबीवर चढून केलं उड्डाणपुलाचं उद्घाटन

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (MMRDA) ने बांधलेला चुनाभट्टी – बीकेसी हा उड्डाणपूल वाहतूकीसाठी सुरू न झाल्यास रोड रोलर आणून तो आम्ही सुरू करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी राज्य सरकारला दिला आहे.

नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली हा पूल खुला करण्यासाठी रविवारी जाेरदार आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते वाजतगाजत उड्डाणपुलाजवळ आले. त्यानंतर मलिक यांनी जेसीबीवर चढून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

राष्ट्रवादीकडून जबरदस्तीने उड्डाणपुलाचं उदघाटन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पोलिसांनी राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांना प्रियदर्शनी सर्कल इथंच अडवलं. त्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सरकारने या पुलाचं त्वरीत लोकार्पण करून हा पूल सुरू करावा, अशी मागणी मलिक यांनी केली. परंतु पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर नवाब मलिक यांनी प्रशासनाला ८ दिवसांची मुदत देत आंदोलन स्थगित केलं. पुलावर सिग्नल यंत्रणा बसवण्यासाठी ८ दिवसांचा वेळ लागेल, असं पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सांगितलं.

त्यावर बोलताना,

लोकशाही आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेला आणि एमएमआरडीएने बांधलेला हा पूल पुढील ८ दिवसांत सुरू न झाल्यास पुढच्या वेळेस रोड रोलर घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मलिक यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी जबरदस्तीने पुलाचं उद्घाटन करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल नोटिसा पाठवल्या आहेत.


हेही वाचा-

‘जिओ’साठी BSNL आणि MTNL चा बळी, नवाब मलिक यांचा आरोप

Exclusive Interview: “हारून नवाब मलिक राजकारणातून बाहेर होणार नाही..!”


पुढील बातमी
इतर बातम्या