Advertisement

Exclusive Interview: “हारून नवाब मलिक राजकारणातून बाहेर होणार नाही..!”


SHARES

गेल्या विधानसभा निवडणुकीत मी केवळ हजार मतांनी पराभूत झालो होतो. याला माझा अतिआत्मविश्वास आणि बोगस मतदान कारणीभूत होतं. पण निवडणुकीत हारून नवाब मलिक कधीही राजकारणातून बाहेर होणार नाही, यावेळेस अणुशक्तीनगरमधून कुठल्याही परिस्थितीत विजयाचा झेंडा फडकवणारच असा निर्धार राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना केला. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या विशेष मुलाखतीत नवाब मलिक म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या १६-१७ वर्षे मुंबईतील पक्षाची जबाबदारी होती. पण इतक्या वर्षांत त्यांना मुंबईत पक्ष वाढवण्यात अपयश आलं.

 

त्यांच्या कारकिर्दीत ३-४ आमदारांच्या पुढं राष्ट्रवादी जाऊ शकली नाही, पण मुंबईच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यावर मी संघटना वाढीवर भर दिला आहे. मुंबईतील विविध प्रश्नांवर आवाज उठवून कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत करत आहे. याचे सकारात्मक परिणाम पुढच्या काळात दिसतील. 

पुढचं सरकार आमचंच येणार असा शिवसेना-भाजप कितीही दावा करत असले, तरी ही फसवाफसवी आता चालणार नाही. निकालानंतर महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसेल. वरळीतील जागेवर उद्धव ठाकरे लढोत किंवा आदित्य आम्ही चांगली टक्कर देऊ, असा विश्वासही मलिक यांनी व्यक्त केला. हेही वाचा-

तयारी राज्यरोहणाची!

मनसेचंही ठरलं, १०० जागा लढवणार?संबंधित विषय
Advertisement