Advertisement

मनसेचंही ठरलं, १०० जागा लढवणार?

लोकसभेप्रमाणाने विधानसभा निवडणूक देखील लढवण्यास इच्छुक नसलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निवडणूक लढवण्यास तयार झाल्याचं समजत आहे.

मनसेचंही ठरलं, १०० जागा लढवणार?
SHARES

लोकसभेप्रमाणाने विधानसभा निवडणूक देखील लढवण्यास इच्छुक नसलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निवडणूक लढवण्यास तयार झाल्याचं समजत आहे. राज्यात मनसे किमान १०० जागा लढवेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  

आव्हान कुणाचं?

मातब्बर नेत्यांच्या गळतीमुळे विरोधी पक्ष अवसान गाळून बसल्याने शिवसेना-भाजप युतीला यंदा विधानसभा निवडणुकीत सहज यश मिळेल, अशी शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यातच ईव्हीएम मशीनमध्ये घोळ होत असल्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दाट संशय असल्याने विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात यावा, अशी त्यांची भूमिका आहे. परंतु इतर पक्षांना मात्र राज यांची भूमिका फारशी पटलेली नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी ईव्हीएमविरोधात काढण्यात येणारा मोर्चा देखील बारगळल्याचं म्हटलं जात आहे.  

पदाधिकाऱ्यांचा आग्रह

परंतु विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असताना मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते मात्र हातावर हात धरून बसल्याचं दिसत आहे. पक्ष आणि कार्यकर्ते टिकवायचे असतील तर निवडणूक लढलीच पाहिजे, असा कार्यकर्त्यांचा विचार आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा हा आग्रह लक्षात घेऊन अखेर राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांना बैठकीचं आयोजन करण्यास सांगितलं. 

तयारीचा आढावा

त्यानुसार शुक्रवारी झालेल्या बैठकीत मनसेच्या नेत्यांनी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली. निवडणूक लढवायची तर त्यासाठी आपली कितपत तयारी आहे, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. त्या बैठकीनंतर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबादसह काही ठराविक शहरांत किमान १०० जागा लढण्याचा निर्णय झाल्याचं समजत आहे. येत्या दोन दिवसांत याबाबत घोषणा होऊ शकते.   

 


हेही वाचा-

मनसे विधानसभा लढवणार की नाही? येत्या २ दिवसांत घोषणेची शक्यता

मराठी माणसांनाच घरं विका, ठाण्यात मनसेचे होर्डिंग्ज



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा