Advertisement

मनसे विधानसभा लढवणार की नाही? येत्या २ दिवसांत घोषणेची शक्यता

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी विधानसभा निवडणूक लढवणार की नाही यावर केवळ राजकीय वर्तुळातच नाही, तर खुद्द पक्षातील कार्यकर्त्यांमध्येच गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.

मनसे विधानसभा लढवणार की नाही? येत्या २ दिवसांत घोषणेची शक्यता
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी विधानसभा निवडणूक लढवणार की नाही यावर केवळ राजकीय वर्तुळातच नाही, तर खुद्द पक्षातील कार्यकर्त्यांमध्येच गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निवडणूक लढवायची की नाही, यावर एकमत झालं नव्हतं. त्यामुळे कार्यकर्ते अधिकच अधिर झाले आहेत. पुण्याच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढवण्याबाबत पक्षाने लवकर निर्णय घ्यावा, अशी कळकळीची विनंतीच वरिष्ठांना केली आहे. त्यानुसार येत्या २ दिवसांत राज ठाकरे पक्षाची भूमिका स्पष्ट करतील, असं म्हटलं जात आहे.    

फक्त प्रचार

लोकसभा निवडणुकीच्या वेळेस पक्षाकडून एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आला नव्हता. असं असलं तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप, मोदी आणि शहा यांच्याविरोधात जोरदार प्रचार केला होता. त्यांच्या प्रचारामुळं मतदानाआधी चांगली हवा निर्माण झाली असली, तरी जनतेच्या रोषाचं मतांमध्ये परिवर्तन होऊ शकलं नाही. 

कार्यकर्त्यांचा आग्रह 

उलट शिवसेना-भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. विधानसभा निवडणुकीत अशाच निकालांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता गृहीत धरून मनसेने आपली शक्ती वाया घालवू, नये असं एका गटाचं म्हणणं आहे. तर पक्ष जिवंत ठेवायचा असेल आणि कार्यकर्ते टिकवायचे असतील, तर निवडणूक लढलीच पाहिजे, असा बहुसंख्य कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. 

६३ मतदारसंघ अनुकूल?

मनसेने केलेल्या अभ्यासानुसार राज्यातील ६३ मतदारसंघ मनसेला अनुकूल आहेत. त्यामध्ये मनसेचे उमेदवार पहिल्या ३ क्रमांकांत राहतील, असा पक्षाचा अंदाज आहे. त्याचा विस्तृत अहवाल राज ठाकरे यांना सादर करण्यात आला आहे. त्याआधारे राज संबंधित मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत असल्याचे समजत आहे. सोबतच कार्यकर्त्यांचं म्हणणं देखील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. 

त्यानुसार येत्या २ दिवसांत राज ठाकरे मनसे निवडणूक लढवणार की नाही, याबाबत २ दिवसांत निर्णय जाहीर करतील, असा अंदाज आहे. हेही वाचा-

यंदाही आघाडीत मनसे नाही?

ईडीच्या चौकशीपासून राज ठाकरे बोलायचे कमी झालेत- अजित पवारRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा