महाराष्ट्र नवनिर्माण सेने (mns)ने पुन्हा एकदा परप्रांतीय मुद्द्याला हात घालण्याचं ठरवलं आहे. ठाण्यामध्ये मनसेने ठिकठिकाणी होर्डिंग्ज लावले आहेत. यांत शहरातील घरं केवळ मराठी भाषिकांनाच विकण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मराठी भाषिकांना घरं विकत घेण्यास किंवा भाड्याने घेण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. काही विकासक केवळ परप्रांतीयांनाच घरं विकत असल्याने मराठी भाषिकांनी घर कुणाकडून विकत घ्यावं, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळंच मनसेने जागोजागी होर्डिंग्ज लावून विकासकांना इशारा दिल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांने सांगितलं.
मनसेने लावलेल्या होर्डिंग्जवर ‘आपलं ठाणे, मराठी ठाणे, आपलं घर मराठी माणसालाच विका, लढा ठाण्याच्या मराठी माणसाचा,’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे. या होर्डिंग्जवर मनसे नेते अभिजीत पानसे आणि अविनाश जाधव यांची नावं लिहिण्यात आली आहेत.
काही दिवसांपूर्वीच ठाण्यात एका गुजराती कुटुंबाने मराठी तरूणाला शुल्लक कारणांवरून मारहाण केली होती. मारहाण करणाऱ्या या गुजराती व्यक्तिला शोधून काढत अविनाश जाधव यांनी त्याचा वचपा काढला होता तसंच त्याला माफीही मागायला लावली होती.
हेही वाचा-
मनसे विधानसभा लढवणार की नाही? येत्या २ दिवसांत घोषणेची शक्यता