राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारत भाजपाशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानं राष्ट्रवादीसह राज्यात राजकीय भूकंप आला आहे. त्यामुळं अजित पवार यांच्याविरोधात काही नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संतप्त भावना असताना त्यांची मनधरणी करण्याचाही प्रयत्न सुरु आहे.
राष्ट्रवादीनं मात्र आपण अद्यापही शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासंबंधी सकारात्मक असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आजही ट्विटरवरुन शेर शेअर केला असून हम होंगे कामयाब! असं सूचक विधान केलं आहे.
राज्यातील सत्तासंघर्षाला शनिवारी अगदीच अनेपेक्षित कलाटणी मिळाली. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ शनिवारी घेतली. अचानक घडलेल्या या शपथविधीमुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. त्यानंतर अजित पवारांनी दिलेलेलं समर्थन हे वैयक्तीक आहे हा राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा -
अजित पवारांच्या गटाला १२ मंत्रीपदं,१५ महामंडळ?
महाराष्ट्रातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी