Advertisement

महाराष्ट्रातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी


महाराष्ट्रातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
SHARES

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून सर्वोच्च न्यायालयात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. सकाळी १०.३० वाजता ही सुनावणी होणार आहे. तसंच, यावेळी सर्व पत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळं सर्वोच्च न्यायालय कोणाच्या बाजून निकाल देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेत तातडीनं विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा आदेश मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका केलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकासआघाडीला रविवारी दिलासा मिळाला नव्हता. परंतु, राज्यपालांच्या सत्तास्थापनेच्या आमंत्रणाच्या पत्राची व भाजपनं केलेल्या सत्तास्थापनेच्या दाव्याच्या पत्राची चाचपणी करण्याचा पवित्रा न्यायालयानं घेतला आहे. यावेळी, आवश्यकता भासल्यास सत्तास्थापनेशी संबंधित राज्यपालांकडील कागदपत्रंही सादर करण्याची तयारी केंद्र सरकारनं दर्शवली.

हेही वाचा - अजित पवारांची बंडखोरी सुप्रिया सुळेंच्या पथ्थ्यावर?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यासाठी तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला आमंत्रित करण्याचे आदेश राज्यपालांना द्यावे, या तातडीच्या याचिकेवर रविवारी न्या. एन. व्ही. रामणा, न्या. अशोक भूषण व न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

शिवसेनेतर्फे वकील व काँग्रेस नेते कपिल सिब्बल, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसतर्फे अभिषेक मनु सिंघवी तर, केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. 'राज्यपालांकडून सत्तास्थापनेचे पत्र मिळाल्यापासून २४ तासांत विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा आदेश नवनियुक्त राज्य सरकारला द्यावा', अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

याप्रकरणात खंडपीठानं केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नोटीस बजावून बाजू मांडण्यास सांगितलं आहे.



हेही वाचा -

अजित पवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू

सर्वोच्च न्यायालयात काय घडलं? 'हे' आहेत महत्त्वाचे मुद्दे



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा