Advertisement

अजित पवारांची बंडखोरी सुप्रिया सुळेंच्या पथ्थ्यावर?

शरद पवार यांचे राजकीय वारसदार कोण असा प्रश्न वारंवार विचारला जातो. त्यावर राज्यात अजीत पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे असं उत्तर दिलं जातं.

अजित पवारांची बंडखोरी सुप्रिया सुळेंच्या पथ्थ्यावर?
SHARES

अजित पवार यांनी केलेली बंडखोरी राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रुचलेली नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार आगपाखड केली.  राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अजित पवार यांनी शरद पवार यांना दगा देत त्यांच्या पाठीत खंजीर खुपसले अशी टीका शिवसेनेचे संजय राऊत यांनी केली. मात्र, शरद पवारांच्या राजकीय वारसदाराचा प्रश्नही मिटला, असं ट्विट करत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी सुप्रिया सुळे यांचं अभिनंदनही केलं आहे.

राष्ट्रवादीचे ५४ पैकी ५३ आमदार शरद पवार यांच्यासोबत राहतील. अजित पवार एकटे पडतील. शरद पवारांच्या राजकीय वारसदाराचा प्रश्नही मिटला. सुप्रिया सुळे, आपले अभिनंदन, असं ट्विट दिग्विजय सिंह यांनी केले आहे.

शरद पवार यांचे राजकीय वारसदार कोण असा प्रश्न वारंवार विचारला जातो. त्यावर राज्यात अजीत पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे असं उत्तर  दिलं जातं. आता मात्र अजीतदादांच्या बंडखोरीमुळे हा प्रश्न निकालात निघेल , असं बोललं जात आहे. ही बंडखोरी सुप्रिया सुळे यांच्या पथ्थ्यावर पडेल का हे आगामी काळच ठरवेल.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा