Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

अजित पवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू

शनिवारी देखील राष्ट्रवादीचे काही नेते अजित पवार यांच्या मनधरणीसाठी गेले होते. पण अजित पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

अजित पवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू
SHARES

एकीकडे सत्तास्थापनेचा पेच सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेला असताना राष्ट्रवादीनं नवा डाव खेळायला सुरूवात केली आहे. राष्ट्रवादीनं आपल्याला पक्षातील ५१ आमदारांचा पाठिंबा असल्याची लिस्टच राजभवनाला सोपवली आहे. या यादीत खुद्द अजित पवार यांचं नाव आहे. राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नव्हते. मात्र, राष्ट्रवादीनं ही यादी राजभवनाला सोपवली आहे.


"५१ आमदार आमच्यासोबत"

राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील रविवारी सकाळी राजभवन पोहोचले. ५१ आमदारांची यादी त्यांच्याकडे होती. त्यात अजित पवारांचेही नाव होतं. पण, त्यावर अजित पवार यांची स्वाक्षरी नव्हती. जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ५१ आमदार आमच्यासोबत आहेत. आता अजित पवार यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अजित पवार यांची भेटही घेतली जात आहे.


अजित पवारांचा निर्णय बदलेल का?

राष्ट्रवादीनं अजित पवार यांना विधिमंडळ नेते पदावरून हकालपट्टी केली असली तरी पक्षातून काढलं नाही. याचा अर्थ अजूनही अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शनिवारी देखील राष्ट्रवादीचे काही नेते अजित पवार यांच्या मनधरणीसाठी गेले होते. पण अजित पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

त्यामुळे रविवारी सकाळी जयंत पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली. अजित पवार यांचा निर्णय बदलण्यात राष्ट्रवादीला यश येईल का? या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले की, प्रयत्न करणाऱ्यांना कधी अपयश येत नाही. त्यामुळे अजित पवार यांची मनधारणी करण्यात यश येतं की नाही हे काही दिवसांमध्ये कळेलच.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा