Advertisement

अजित पवारांच्या गटाला १२ मंत्रीपदं,१५ महामंडळ?

शनिवारी झालेल्या शपथविधीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली.

अजित पवारांच्या गटाला १२ मंत्रीपदं,१५ महामंडळ?
SHARES

शनिवारी झालेल्या शपथविधीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीसाठी अजित पवार रविवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले. त्यावेळी मंत्रिपदांबाबत चर्चा झाल्याचे बोललं जात आहे. तसंच, अजित पवार यांच्या गटाला १२ मंत्रीपदं १५ महामंडळं दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर आली आहे.

राजकीय भूकंप

महाराष्ट्रात महाविकासआघाडीचं सरकार येण्याची चिन्ह असताना शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळं राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. याविरोधात महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. त्यावर रविवारी सुनावणी झाली असून सोमवारीही सुनावणी होणार आहे.

हेही वाचा - राष्ट्रवादीचे बेपत्ता आमदार मुंबईत दाखल

अजित पवार यांच्या पाठीशी २७ आमदार असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या पाठिंब्यानं भाजपा बहुमत सिद्ध करु शकलं आणि सरकार स्थापना झाली तर अजित पवारांच्या गटाला १२ मंत्रीपदं १५ महामंडळं दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे.

या भेटीत भाजपा आणि राष्ट्रवादीचे सरकार बनणार असल्याचा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे. तर, भाजपाने मात्र ही बैठक फक्त बहुमत सिद्ध करण्यासंबंधी तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीसंदर्भात होती अशी माहिती दिली.



हेही वाचा -

ट्रकचालकांचा सोमवारपासून बेमुदत बंद

अजित पवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा