Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,09,215
Recovered:
47,07,980
Deaths:
79,552
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
37,656
1,657
Maharashtra
5,19,254
39,923

राष्ट्रवादीचे बेपत्ता आमदार मुंबईत दाखल


राष्ट्रवादीचे बेपत्ता आमदार मुंबईत दाखल
SHARES

राज्यातील सत्तेचा पेच सुटण्याऐवजी आणखी चिघळला आहे. भाजपानं सरकार स्थापन करून सर्वांना चकित केलं. या घटनेनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं थेट सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं. या याचिकेवर रविवारी सुनावणी झाली असून, सोमवारी सत्तास्थापनेच्या निर्णयासंदर्भातील कागदपत्रं न्यायालयात सादर केली जाणार आहेत. दरम्यान, अजित पवारांनी दिलेल्या धक्क्यानंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा पक्षाला सावरण्यासाठी सर्वांना एका छताखाली आणण्याचं काम सुरू केलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानं मागील दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणला वेगळीच राजकीय कलाटणी मिळाली आहे. अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करत राजभवनात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसंच, देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी अजित पवारांसोबत शपथविधीला उपस्थित असलेले आमदार एकामागोमाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात परत येऊ लागले असून, संपर्काबाहेर असलेल्या राष्ट्रवादीच्या ४ आमदारांना अखेर मुंबईत आणण्यात आलं आहे.

राष्ट्रवादीच्या या आमदारांना विमानानं परत आणण्यात आलं. आता अजित पवार वगळता सर्वच आमदार राष्ट्रवादीसोबत आहेत, असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.  राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमदार अनिल भाईदास पाटील आणि दौलत दरोडा यांना रविवारी रात्री विमानानं मुंबईत आणलं. हे दोन्ही आमदार हरियाणातील गुरुग्राममध्ये असलेल्या एका हॉटेलात वास्तव्याला होते. तसंच, आमदार नितीन पवारही मुंबईत दाखल झाले आहेत. आमदार नरहरी झिरवळ दिल्लीत एका सुरक्षित ठिकाणी असल्याची माहिती आहे.

या सर्व आमदारांना मुंबईतील ‘द हयात’ हॉटेलमध्ये वास्तव्यास ठेवण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे ५४ आमदार निवडून आले असून, आता राष्ट्रवादीच्या गोटात ५२ आमदार असून अजित पवारांच्या गोटात एकच आमदार आहे. एका आमदारावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं.

अनिल पाटील यांनी फेसबुकवरुन आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर बाबासाहेब पाटील यांनीही आपण पवारांसोबत असल्याचं फेसबुकवरुनच स्पष्ट केलं होतं. नितीन पवार शनिवारी पक्षाच्या बैठकीला जात असल्याचं सांगून गेले ते परत आलेच नव्हते. तसेच त्यांच्याशी घरच्यांचा संपर्कही होत नव्हता. त्यामुळं त्यांच्या मुलानं पंचवटी पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. 'माझी काळजी करु नका, मी शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ, राष्ट्रवादी पक्षासोबत आहे. माझ्या कुटुंबाने इतर कोणताही विचार करु नये. कोणताही गैरसमज करुन घेऊ नये.’ असं नितीन पवार यांनी एका व्हिडीओद्वारे स्पष्ट केलं होतं.हेही वाचा -

महाराष्ट्रातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

अजित पवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरूसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा