Coronavirus Updates: मंत्रालयात मास्कशिवाय प्रवेश नाही

मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यांगतांना मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळं पुढील काही महिने मास्कशिवाय मंत्रालयात प्रवेश दिला जाणार नसल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सरकारसह सर्व स्तरावर विविध उपाययोजना करत कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे सुरू आहेत. 

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या सूचनेचं सर्व अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यांगतांनी पालन करून मंत्रालयात येताना चेहऱ्यावर मास्क लावूनच प्रवेश करावा, अन्यथा त्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आलं आहे.

राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळं सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. राज्यात ११३ रुग्णांची चाचणी पॉझिटीव्ह आली असून, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७४८ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणं, ५६ जणांची डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून रुग्णांची संख्या आता ४५ वर पोहोचली आहे.


हेही वाचा -

Coronavirus Updates: मुंबईच्या 'या' भागात सर्वाधिक करोनाग्रस्त

Coronavirus Updates: मुंबईच्या अनेक भागांत पॅकबंद मिठाचा तुटवडा


पुढील बातमी
इतर बातम्या