Coronavirus Updates: मुंबईच्या अनेक भागांत पॅकबंद मिठाचा तुटवडा


Coronavirus Updates: मुंबईच्या अनेक भागांत पॅकबंद मिठाचा तुटवडा
SHARES

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळं कोरोनाच्या तसंच, किराणा माल संपेल या भीतीनं नागरिकांनी दुकानांबाहेर गर्दी करण्यास सुरूवात केली. दुकानांबाहेर मोठ-मोठ्या रांगा लावून नागरिकांनी किराणा मालाचा साठा केला. दरम्यान, लॉकडाऊनच्या प्रत्येक दिवसांत दुकानांबाहेर किराणा सामानासाठी गर्दी होत असल्यानं आता मुंबईमध्ये किराणा मालाचा तुटवडा जाणवू लागला आहे.

मुंबईच्या अनेक भागांमध्ये पॅकबंद मिठाचा तुटवडा भासत आहे. किराणा दुकानांमध्ये मागील काही दिवसांपासून मीठ नसल्याचं चित्र असून, घाऊक विक्रेत्यांकडे साठा आहे. मात्र, मालाची चढउतार आणि ने-आण करण्यासाठी कामगार नसल्यानं ही परिस्थिती ओढवली असल्याचं दुकानदारांचं म्हणणं आहे. देशभरात २४ मार्च मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची अंलबजावणी करण्यात आली. त्याआधी अनेकांच्या घरात काही दिवस पुरेल इतके अन्नधान्य होते, तर काही जणांनी नंतर तजवीज केली. 

महिनाभर पुरेल इतका साठा करण्यात आला. दुकानांमध्ये मिठाची मागणी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढू लागली. दरम्यान गेल्या २ दिवसांपासून मध्य मुंबई, दक्षिण मुंबई तसंच, मुंबईच्या इतर काही भागांमध्ये पॅकबंद मीठ संपलं आहे. माल येत नसल्याने मिठाची टंचाई असल्याचे विक्रेते सांगत आहे. लॉकडाऊनमुळे कामगारांना घराबाहेर पडता येत नसल्याने ते कामावर येत नाहीत आणि त्याचा फटका वितरणावर होत असल्याचं समजतं. या प्रकरणी सरकारनं लक्ष घालणं गरजेचं असल्याचं ग्राहकांचं म्हणणं आहे.हेही वाचा -

जलविद्युत प्रकल्प ठरले वरदान, 'यामुळे' वीज पुरवठा नाही झाला खंडीत

महानगर गॅसदरात कपात, बिल ५३ रुपयांपर्यंत स्वस्तसंबंधित विषय