महानगर गॅसदरात कपात, बिल ५३ रुपयांपर्यंत स्वस्त

मुंबई व परिसरातील स्वयंपाकाच्या पाइप गॅसचे बिल ५३ रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहे.

महानगर गॅसदरात कपात, बिल ५३ रुपयांपर्यंत स्वस्त
SHARES

महानगर गॅसचा वपर करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई व परिसरातील स्वयंपाकाच्या पाइप गॅसचे बिल ५३ रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहे. महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) गॅसच्या दरात प्रति घन मीटर (एससीएम) ८८ पैसे घट केली आहे. 

प्रति महिना ६० एससीएम या पहिल्या श्रेणीतील ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे. एमजीएलने शनिवारी गॅस पुरवठा दरात १ रुपया घट करण्याची घोषणा केली. घरगुती नैसर्गिक वायू (पीएनजी) व वाहनांसाठीच्या कम्प्रेस नॅचरल गॅसच्या (सीएनजी) किमतीत घट झाली आहे. सीएनजी दरात २ रुपये प्रति किलो व पीएनजीच्या दरात १ रुपया प्रति एससीएम घट करण्यात आली. पण पीएनजीबाबत प्रत्यक्ष घट फक्त ८८ पैसे ठरली आहे. 

पीएनजीचा सध्याचा दर २६.९६ रुपये प्रति एससीएम (६० एससीएमपर्यंत) आहे. तो दर आता २६.०८ रुपये होणार आहे. तर ६० ते १५० एससीएमदरम्यानचा सध्याा दर ३१.८९ रुपये आहे. तो साधारण ३१ रुपये होईल. परंतु सर्वाधिक घरगुती ग्राहक पहिल्या श्रेणीतच आहेत. तर दुसऱ्या श्रेणीत प्रामुख्याने व्यावसायिक ग्राहक आहेत. दुसरीकडे सीएनजीचा दर आता मुंबई व परिसरात ४७.९५ रुपये प्रति किलो झाला आहे.

संबंधित विषय