Advertisement

Coronavirus Updates: मुंबईच्या 'या' भागात सर्वाधिक करोनाग्रस्त

राज्यासह मुंबईत करोनाचे रोज नवीन रुग्ण सापडत असून, यामध्ये मुंबईचे रुग्ण जास्त आहेत.

Coronavirus Updates: मुंबईच्या 'या' भागात सर्वाधिक करोनाग्रस्त
SHARES

जीवघेण्या कोरोना व्हायरसचा मुंबईसह देशभरात विळखा बसत आहे. दिवसेंदिवस कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळं सर्वत्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. राज्यातील रुग्णांच्या एकूण संख्येपैकी निम्मी संख्याही मुंबईतच आहे. मुंबईच्या विविध भागांत करोनाचा शिरकाव झाला असून, महापालिकेच्या आकडेवारीनुसार वरळी, प्रभादेवी परिसरात सर्वाधिक ५८ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर फोर्ट भागात इतर विभागापेक्षा कमी रुग्ण सापडल्याची नोंद झाली आहे.

राज्यासह मुंबईत करोनाचे रोज नवीन रुग्ण सापडत असून, यामध्ये मुंबईचे रुग्ण जास्त आहेत. हा संसर्ग मुंबईच्या विविध भागांत पसरत असल्याने पालिका प्रशासन चिंतेत आहे. मुंबईत आतापर्यंत ३७७ हून अधिक रुग्ण सापडले असून, त्यापैकी जी-दक्षिण विभागातील वरळी, प्रभादेवी येथे सर्वाधिक ५८ रुग्ण सापडले आहेत. वरळी, प्रभादेवी हे परिसर कॉर्पोरेट ऑफिसेस असलेले विभाग म्हणून ओळखण्यात येत असले, तरी या भागांत झोपडपट्ट्यादेखील आहेत. 

बीडीडी चाळी, बेस्ट वसाहत, पोलिस कॅम्प या वसाहतींची अवस्था दयनीय आहे. जी-दक्षिण विभागात हे सर्व भाग मोडतात. इथं करोनाचे सर्वाधिक ५८ रुग्ण सापडले आहेत. यापैकी वरळी कोळीवाडा वसाहत सील करण्यात आली आहे. कार्यालयं, छोटे उद्योग अधिक आणि रहिवासी वस्ती कमी असलेल्या मशिद बंदर 'बी' विभागात सर्वात कमी म्हणजे फक्त २ रुग्ण सापडले आहेत. ग्रँट रोड 'डी' विभागात ३१, तर अंधेरी पश्चिम 'के पश्चिम' आणि 'के पूर्व' विभागात अनुक्रमे २५ आणि २४ करोनाबाधित रुग्ण सापडले असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.



हेही वाचा -

जलविद्युत प्रकल्प ठरले वरदान, 'यामुळे' वीज पुरवठा नाही झाला खंडीत

महानगर गॅसदरात कपात, बिल ५३ रुपयांपर्यंत स्वस्त



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा