आमच्यात घुसखोरी नको, ओबीसी कार्यकर्त्यांचं आझाद मैदानात आंदोलन

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास ओबीसींवर अन्याय होईल, असं म्हणत ओबीसी कार्यकर्त्यांनी मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आहे. ओबीसी संघर्ष समन्वयक समितीच्या वतीने गुरूवारी दुपारी आझाद मैदानात आंदोलन करण्यात आलं आहे.

विधेयक मंजूर

राज्य सरकारने सादर केलेल्या मराठा आरक्षण विधेयकाला विधीमंळात कुठल्याही चर्चेविना सर्वसहमतीने मंजुरी देण्यात आली. या विधेयकाला विरोध करण्यासाठी ओबीसी संघर्ष समन्वयक समिती व इतर समितीतर्फे आझाद मैदानात आंदोलन करण्यात येत आहे.

ओबीसी समाजाचं म्हणणं काय?

मराठा जातीची लोकसंख्या ३२ टक्के सांगण्यात येत असून ही सरकारची दिशाभूल करणारी लोकसंख्या आहे. त्यशिवाय यात कुणबी जातीचाही समावेश असून त्यांना आधीच ओबीसीत आरक्षण देण्यात आलं आहे.

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्ग तयार करून १६ टक्के आरक्षण देण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. मात्र राज्यातील आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांहून अधिक गेल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा भंग होणार आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं, यासाठी सरकारवर दबाव वाढत आहे.

त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये, या मुख्य मागणीसाठी ओबीसी संघर्ष समन्वयक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बावकर यांच्यावतीने आंदोलन करण्यात आलं आहे.


हेही वाचा-

ओबीसीही आता रस्त्यावर, गुरूवारी आझाद मैदानावर ठिय्या

मराठा आरक्षण Live - मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर, राज्यभर जल्लोष


पुढील बातमी
इतर बातम्या