Advertisement

ओबीसीही आता रस्त्यावर, गुरूवारी आझाद मैदानावर ठिय्या

एसईबीसीची घटनात्मक अर्थ ओबीसी असा असल्यानं मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणातूनच आरक्षण देण्यात येणार आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालचं पाहिजे, पण ओबीसीतून आरक्षण देणं आम्हाला मान्य नाही, असं म्हणत ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे.

ओबीसीही आता रस्त्यावर, गुरूवारी आझाद मैदानावर ठिय्या
SHARES

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार असल्याचं राज्य सरकारकडून सांगितलं जात असलं तरी यामध्ये अजूनही स्पष्टता नाही. एसईबीसीची घटनात्मक अर्थ ओबीसी असा असल्यानं मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणातूनच आरक्षण देण्यात येणार आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालचं पाहिजे, पण ओबीसीतून आरक्षण देणं आम्हाला मान्य नाही, असं म्हणत ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार गुरूवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आझाद मैदानावर धरणं आदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेंडगे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


गुरूवारी विधेयक मांडणार

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून तयार करण्यात आलेल्या अहवालातील शिफारसी स्वीकारत सरकारनं गुरूवारी आरक्षण देण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी सरकारनं मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात येणार असून हे आरक्षण एसईबीसी या नव्या प्रवर्गातून देण्याचंही जाहीर केलं आहे.


घटनात्मक अर्थ एकच

ओबीसी समाजानं मात्र एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास सुरूवातीपासूनच विरोध दर्शवला आहे. कारण ओबीसी नेत्यांच्या म्हणण्यानुसार एसईबीची म्हणजेच ओबीसी, त्याचा घटनात्मक अर्थ हाच आहे. त्यामुळे सरकार ओबीसीमधूनच हे आरक्षण देणार हे स्पष्ट असल्याचं ओबीसी नेत्यांचं आणि संघटनांचं म्हणणं आहे.


ओबीसींवर अन्याय

ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देणं हा ओबीसींवर अन्याय आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आम्ही आग्रही आहोत. पण हे आरक्षण स्वतंत्र आणि न्यायालयात टिकेल असं हवं. सरकार मात्र याबाबत कोणतीही स्पष्टता न देता सर्वांचीच दिशाभूल करत असल्याचा आरोप शेंडगे आणि ओबीसी संघटनांनी केला आहे. त्यामुळेच असं आरक्षण देण्याला विरोध करत सरकारपर्यंत विरोध पोहचवण्यासाठी ओबीसी संघटनांनी आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

गुरूवारी आझाद मैदानावर धरणं आंदोलन होणार आहे. तर आरक्षणाचं विधेयक मंजूर झाल्यानंतर सरकारनं नेमकं कसं आरक्षण दिलं आहे हे स्पष्ट होईल. त्यामुळं पुढची आंदोलनाची दिशा विधेयकाच्या मंजुरीनंतरच ठरवली जाईल, असंही शेंडगे यांनी सांगितलं आहे. ओबीसीमधून आरक्षण दिलं गेलं तर ओबीसी समाजाचं आंदोलन आणखी तीव्र होईल, असा इशाराही शेंडगे यांनी दिला आहे.



हेही वाचा-

मराठा आरक्षण वादात... ओबीसी संघटना न्यायालयात देणार आव्हान

सरकारनं आंदोलनात फूट पाडली, मराठा क्रांती मोर्चाचा गंभीर आरोप

मराठा आरक्षणाचं राजकारण करू नका, आंदोलकांचा नेत्यांना इशारा



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा