शिवसेनेचे ३५ नाराज आमदार भाजपकडे येणार, नारायण राणे यांचा दावा

शिवसेनेच्या ५६ आमदारांपैकी ३५ आमदार नाराज असल्याचा दावा राज्याचे भाजप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. राज्यातील ठाकरे सरकार हे 'नाकारलेले' सरकार असल्याचंही राणे म्हणाले.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राणे यांनी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांना सरकार चालवता येत नाही. औरंगाबाद दौऱ्यावर जाऊनही मुख्यमंत्री कुठलीही घोषणा न करताच तेथून परतले. राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा ठाकरे सरकारचा दावाही खोटा असल्याची टीका राणे यांनी केली.

हेही वाचा- मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना, भाजपची भूमिका काय? 

ज्यांनी सरकार स्थापन करण्यासाठीच ५ आठवडे घेतले, ते कसे सरकार चालवणार? असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेकडे असलेल्या ५६ आमदारांपैकी ३५ आमदार नाराज आहेत. हे आमदार भाजपकडे येऊ शकतात. तसं झाल्यास १०५ आमदारांचं संख्याबळ असलेला भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकतो, असा दावाही राणे यांनी केला. 

भाजप आणि मनसे भविष्यात एकत्र येणार का? या प्रश्नावर स्पष्ट शब्दांत उत्तर न देता भाजपचे प्रदेशाध्यक्षच यावर बोलतील, असं राणे म्हणाले.

हेही वाचा- महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेचा मानखुर्दमध्ये दणदणीत विजय

 

पुढील बातमी
इतर बातम्या