Advertisement

महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेचा मानखुर्दमध्ये दणदणीत विजय

शिवसेनेने मानखुर्द येथील प्रभाग क्रमांक १४१ मध्ये झालेल्या पालिका पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे.

महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेचा मानखुर्दमध्ये दणदणीत विजय
SHARES

शिवसेनेने मानखुर्द येथील प्रभाग क्रमांक १४१ मध्ये झालेल्या पालिका पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. शिवसेनेचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांनी भाजपाचे उमेदवार बबलू पांचाळ यांचा १ हजार ३८५ मतांनी पराभव केला.  विठ्ठल लोकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने या प्रभागात पोटनिवडणूक झाली. 

निवडणुकीत लोकरे यांना ४ हजार ४२७ तर पांचाळ यांना ३ हजार ४२ मते मिळाली.  शिवसेना, भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्ष या प्रमुख पक्षांसह एकूण १८ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.  एकूण १८ हजार ५४ पुरुष आणि १४ हजार ३२ महिला मतदार असे एकूण ३२ हजार ८६ मतदार या प्रभागात आहेत. पोटनिवडणुकीत १३,४७६ मतदारांनी मतदान केले होते. यामध्ये, ७३४४ पुरुष मतदार आणि ६१३२ महिला मतदारांचा समावेश होता. 

शुक्रवारी सकाळी  १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर एका तासात निकाल हाती आला. विधानसभा निवडणुकीवेळी विठ्ठल लोकरे यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली होती. राज्यात सत्ता आल्यानंतर शिवसेनेला उभारी मिळाल्याचं दिसत आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांत शिवसेनेला चांगलं यश मिळालं आहे. मुंबई पालिका पोटनिवडणुकीतही शिवसेनेला यश मिळाल्याने शिवसेनेचं पालिकेतील बळ वाढलं आहे. 



हेही वाचा -

अभिनेत्रींनी मुंबईतच राहून नाचावं, भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

भाजप नेत्याची ‘गांधी शांती यात्रा’ मुंबईतून सुरू




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा