रिलिजआधीच वादाच्या भोवऱ्याच आडकलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाला सेन्सॉर बोर्डानं 'यू' प्रमाणपत्र दिलं आहे. प्रमाणपत्र मिळाल्याने हा सिनेमा ११ एप्रिलला रिलिज होईल, असं म्हटलं जात असतानाच निवडणूक आयोगानं सिनेमाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणली आहे. लोकसभा निवडणूक असल्यामुळं या काळात सिनेमाच्या रिलिजवर स्थगिती आणण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयानं हा सिनेमा रिलिज झाल्यास आचारसंहितेचा भंग होईल की नाही?, याचा निर्णय निवडणूक आयोगानं घ्यावा, असं स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आयोगानं हा निर्णय घेतला आहे.
'या सिनेमाद्वारे मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असून, त्यामुळे आचारसंहितेचा भंग होईल, अशी याचिका काँग्रेस कार्यकत्यानं दाखल केली होती. सर्वोच्च न्यायलयानं ही याचिका फेटाळली. तसंच, 'सिनेमाचं प्रदर्शन स्थगित करणं ही बाब सोपी नाही. अद्याप सिनेमाला सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्रही मिळालेलं नाही. त्यामुळं यावर निर्णय देणं अपरिपक्वतेचं ठरेल. आम्ही यावर निकाल देणं योग्य नाही. त्याशिवाय, या सिनेमामुळं मतदार भाजपाकडं आकर्षित होतील आणि त्याचा निवडणुकीवर परिणाम होईल, असं काँग्रेस याचिकाकर्त्यांना वाटत असेल, तर त्यावर निवडणूक आयोगच योग्य तो निर्णय घेऊ शकेल’, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अभिनेता विवेक ओबेरॉयनं 'तुमच्या सगळ्यांचा आर्शीवाद आणि पाठिंब्यामुळं आम्ही कोर्टात जिंकू शकलो. 'भारताच्या न्यायव्यवस्थेचे आभार' असं या सिनेमात नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक ओबेरॉय यानं ट्विटरवर ट्वीट केलं.
हेही वाचा -
‘पालखी कॅब'ची टॅक्सी सेवा सुरू
अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी दोन नायजेरियनला अटक