Advertisement

‘पालखी कॅब'ची टॅक्सी सेवा सुरू

एकाच ऍपच्या माध्यमातून प्रवाशांना विविध सेवा पुरविण्याच्या उद्देशानं मुंबई, पनवेलपर्यंत 'पालखी कॅब' सुरू करण्यात येणार आहे. सुरक्षित आणि दर्जेदार वाहतुकीची सुविधा प्रवशांना देण्यासाठी 'पालखी कॅब' ७ मेपासून सेवेत दाखल होणार आहे.

‘पालखी कॅब'ची टॅक्सी सेवा सुरू
SHARES

एकाच अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना विविध सेवा पुरविण्याच्या उद्देशानं मुंबई, पनवेलपर्यंत 'पालखी कॅब' सुरू करण्यात येणार आहे. सुरक्षित आणि दर्जेदार वाहतुकीची सुविधा प्रवशांना देण्यासाठी 'पालखी कॅब' ७ मेपासून सेवेत दाखल होणार आहे. दरम्यान, पालखी कॅब या सेवेचं ३० एप्रिल रोजी ठाण्यात उद्घाटन होणार असून पहिल्या टप्प्यात २० हजार टॅक्सी धावणार असल्याची माहिती 'पालखी कॅब'चे संस्थापक, सीईओ प्रफुल शिंदे यांनी दिली. 


टॅक्सी चालकांना ट्रेनिंग

मुंबई, ठाणे, नागपूर, सातारा, नाशिक, नगर, पुणे यांसारख्या अनेक ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, पालखी कॅबमधील चालकांना विविध भाषा याव्यात यासाठी त्यांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे. ही ट्रेनिंग ठाण्यात सुरू करण्यात आली असून त्यामुळं पर्यटनालाही चालना मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 


अनेक सुविधा 

दरम्यान, नागरिकांना वाहतुकीसोबत अनेक सुविधा पुरविण्यासाठी 'पालखी' अॅप बनविण्यात आलं आहे. पालखी अॅपच्या माध्यमातून नागरिकांना प्रवासी सेवेसह टिफिन सेवाही दिली जाणार आहे. या सेवेसाठी महिला बचत गटांची मदत घेण्यात येणार महिलांनाही रोजगार मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याशिवाय या अॅपच्या माध्यमातून नागरिकांना हॉटेलची माहिती देखी मिळणार आहे. त्यामुळं नागरिकांना कोणत्याही ठिकाणी गेल्यास हॉटेल शोधणं सोपं होणार असल्याचं प्रफुल शिंदे यांनी सांगितलं. 



हेही वाचा -

'झी' आणि 'अँड टीव्ही'ला राज्य निवडणूक आयोगाची नोटीस



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा