अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी २ नायजेरियनला अटक

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन भिन्न गुन्ह्यात २ नायजेरियन तरुणांना अटक करण्यात आली आहे.

अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी २ नायजेरियनला अटक
SHARES

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत २ नायजेरियन तरुणांना अटक करण्यात आली आहे. अनिदिओबी ओनेका जॉन (३७), रोमस ब्रेअल उर्फ ओबोलू बर्नाड इकेचुक्वू (३१) अशी या दोघांची नावे आहेत. एका तरुणाकडून ५ किलो एफिन्ड्रिन, तर दुसऱ्या नायजेरियनकडून ३२० ग्रॅम कोकेन हस्तगत केलं असून, हे कोकेन परदेशात पाठवलं जात होतं.


२ पार्सलची तपासणी

या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीतील एका कुरिअर कंपनीच्या कार्यालयात २ पार्सलची तपासणी करण्यात आली. त्यात १ किलो एम्फेटामाईन व ५ किलो एफिन्ड्रीन हस्तगत करण्यता आलं आहे. यामधील एम्फेटामाईन हे ऑस्ट्रेलियातील अदीर याठिकाणी, तर एफिड्रीनचं पार्सल न्युझिलंडमधील ऑकलंड इथं पाठवण्यात येणार होतं. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास केला असता अनिदिओबी ओनेका जॉन याचा सहभाग निष्पन्न झाला. त्यानुसार, नवी मुंबईतील कोपर खैराणे इथून त्याला अटक करण्यात आली.


३२० ग्रॅम कोकेन हस्तगत

दुसऱ्या कारवाईत दिवा येथील पत्त्यावर ट्रीनिदाद अँड टोबॅगोला येथून आलेलं कुरिअर केंद्रीय अन्वेषण विभागानं ताब्यात घेतलं. ते स्वीकारण्यासाठी आलेल्या रोमस ब्रेअल उर्फ ओबोलू बर्नाड इकेचुक्वू याला रंगेहाथ एनसीबीनं पकडलं. त्यावेळी आरोपीनं पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला मोठ्या शिताफीनं ताब्यात घेण्यात आलं. आरोपीनं पळण्यचा प्रयत्न केल्यानं पळताना पडल्यामुळं आरोपी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. त्याच्याकडून ३२० ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आलं आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



हेही वाचा -

शरीरसौष्ठव क्षेत्रात मराठमोळ्या सागरची 'गरुड झेप'

Lok Sabha Election: ७, ६८५ सराईतांवर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा