SHARE

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी ७ हजार ६८५ सराईत आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तसेच, ४ गुंडांवर एमपीडीए नुसार कारवाई करून त्यांना तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आले आहे. तर, १४१ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.


१ ते दीड लाखांचे बाँड

लोकसभा निवडणुकीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व ही निवडणूक शांततेत पार पाडावी म्हणून मुंबई पोलिसांकडून पूर्वीपासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. पोलिस ठाण्यानुसार सराईतांची यादी काढून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक पोलिस ठाण्याच्या निरीक्षकाने त्यांच्या हद्दीतील सराईत अशा सर्वांची यादी तयार केली असून सराईत आरोपींकडून पोलिस १ ते दीड लाखांचे बाँड लिहून घेत आहे. 


दंडात्मक कारवाई 

या बाँडमध्ये आचार संहिता काळापासून ते निवडणूक प्रक्रिया (३१मे) संपेपर्यंत बाँड लिहून घेतलेल्या व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केले. अथवा या काळात त्याच्यावर दखल अथवा अदखल पाञ गुन्ह्यांची नोंद झाल्यास त्याच्यावर ही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दंडात्मक रक्कम न भरल्यास त्या व्यक्तीवर पोलिस अटकेची कारवाई ही करू शकतात. ही कारवाई सीआपपीसी १०७,१०९,११० नुसार ही कारवाई केली जाणार आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव बाँम्बे पोलिस अँक्ट 55, 56,57 नुसार तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. 


पहिलीच वेळ

आतापर्यंतच्या निवडणूकीच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर सराईत आरोपींवर कारवाई करण्याची पोलिसांची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जाते. अनेकदा पोलिसांजवळ सूडेच्या भावनेतून चुकीची माहिती हि येते. त्यामुळेच मिळालेल्या माहितीची चौकशी करून त्याची सत्यता पडताळूनच पुढे ही कारवाई केली जाणार आहे. या पूर्वी दंडात्मक रक्कम ही ५ ते १० हजार होती. त्यामुळे गुन्हेगारांवर कारवाईचा तेवढा प्रभाव पडत नव्हता. माञ आता पोलिसांनी दंडात्मक रक्कमेत त्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन लिहून घेतलेल्या हमी पञामुळे निवडणूक शांततेत पार पडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


सराईतांवर कारवाई

कलम             आरोपींची संख्या 

कलम १०७               ३४९०

कलम १०९               २३०

कलम ११०              ८७७

तडीपार                    १४१

एमपीडीए                   ०४

अवैध शस्त्र जप्त            १४२

निषेध अंतर्गत प्रकरणे      ३१४

अंमली पदार्थ तस्करी       १४४

नाॅन बेलेबल वाँरट          २१२७हेही वाचा -

३३ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक
संबंधित विषय
ताज्या बातम्या