३३ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक


३३ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक
SHARES

मुंबईच्या गुन्हे शाखेने लूट आणि चोरीच्या सराईत गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस ३३ वर्षानंतर अटक केली आहे. सलीम रुकीया खान असं या आरोपीचं नाव आहे. न्यायालयात त्याच्याविरोधात सुरू असलेल्या गुन्ह्यांच्या तारखेस तो उपस्थित राहत नसल्यामुळे त्याच्या विरोधात न्यायालयाने अटक वाॅरंट बजावलं होतं. 


नाव बदलून वास्तव्य

मुंबईच्या अंधेरी परिसरात राहणाऱ्या सलीमने ३५ वर्षांपूर्वी चाकूचा धाक दाखवून अनेकांना लुटले होते. या गुन्हयात पोलिसांनी त्याला अटकही केली होती. मात्र जामीनावर बाहेर आल्यानंतर सलीम तारखेला हजर राहत नव्हता. तसंच पोलिसांच्या नजरेत न येण्यासाठी त्याने कुंटुबियांसह अंधेरीतील घर विकून तो मिरारोड येथे स्थायिक झाला होता. मिरारोड परिसरात तो नाव बदलून वास्तव्य करत होता. तारखेस हजर न रहात असलेल्या सलीम विरोधात न्यायालयाने अखेर अटक वाॅरंट बजावले. त्यानुसार पोलिस त्याच्या शोधात होते. अखेर एका इस्टेट एजंटकडून सलीम हा मिरारोड परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला ३३ वर्षानंतर अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत. 



हेही वाचा- 

बनावट सोन्याच्या विटा देऊन व्यापाऱ्यांना गंडवणारा अटकेत

प्रेमी युगलांकडे खंडणी मागणारे अटकेत




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा