प्रेमी युगलांकडे खंडणी मागणारे अटकेत

मालाड मार्वे येथील लाँजवर येणाऱ्या प्रेमी युगलांना गाठून त्यांच्या संबधांची माहिती घरातल्यांना देण्याची भीती दाखवत खंडणी मागणाऱ्या दोघांना मालाड पोलिसांनी अटक केली आहे.

प्रेमी युगलांकडे खंडणी मागणारे अटकेत
SHARES

मालाड मार्वे येथील लाँजवर येणाऱ्या प्रेमी युगलांना गाठून त्यांच्या संबधांची माहिती घरातल्यांना देण्याची भीती दाखवत खंडणी मागणाऱ्या दोघांना मालाड पोलिसांनी अटक केली आहे. संदेश मालाडकर, सचिन खारवी अशी या दोघांची नावं असून, या दोघांनी आतापर्यंत ९ ते १० जणांकडून अशाप्रकारे पैसे उकळल्याची माहिती समोर आली आहे. 


२० हजार रुपयांची मागणी

मालाड परिसरात राहणाऱ्या एका दुकानदाराचे एका तरुणीशी प्रेमसंबध होते. दोघंही फिरण्यासाठी मालाड मार्वे परिसरात गेले असता, तेथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. काही वेळानंतर घरी परतण्यासाठी ते तेथून बाहेर पडल्यानंतर या दोघांनी दुकानदाराला गाठत आपण गुन्हे शाखेचे पोलिस असल्याचे सांगितलं. तसंच, महिलेसोबत काय करतोयस? तुझ्या पत्नीचा मोबाईल क्रमांक दे, तिला माहिती देतो, असे सांगून दुकानदाराला धमकावलं. त्यानंतर, ही बाब पत्नीला न सांगण्यासाठी दोघांनी त्याच्याकडं २० हजार रुपयांची मागणी केली. भीतीपोटी दुकानदारानं त्याच्याकडील १२ हजार रुपये देऊन उर्वरित पैसे नंतर देण्याचं आश्वासन दिलं. मात्र, तेथून निघाल्यावर घडलेला प्रकार दुकानदारानं हॉटेलच्या मालकाला सांगितला. त्यानुसार, हॉटेल मालकानं या दोघांना अनेकवेळा संशयितरित्या हॉटेलमधून बाहेर पडणाऱ्या लोकांना अडवताना पाहिलं. रविवारी हे दोघं पुन्हा हॉटेलच्या परिसरात दिसल्यानंतर हॉटेल मालकानं मालाड पोलिसांकडं या दोघांची तक्रार दाखल केली. 


सापळा रचून अटक

हॉटेल मालकानं दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या दोघांना सापळा रचून अटक केली असून, संदेश मालाडकर हा नालासोपारा आणि सचिन खारवी हा ठाण्यात राहणारा रहिवासी आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोपींचा आणखी एक मित्र फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी दोन्ही आरोपींना ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.



हेही वाचा -

मोबाईल तिकीटवर प्रवाशांना मिळणार ५ टक्के बोनस

महाराष्ट्र क्रांती सेनेचा महायुतीला पाठिंबा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा