महाराष्ट्र क्रांती सेनेचा महायुतीला पाठिंबा

महाराष्ट्र क्रांती सेनेनं रविवारी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं झालेल्या कार्यक्रमात क्रांती सेनेने महायुतीला पाठिंबा जाहीर केला.

SHARE

महाराष्ट्र क्रांती सेनेनं रविवारी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं झालेल्या कार्यक्रमात क्रांती सेनेने महायुतीला पाठिंबा जाहीर केला. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते उपस्थित होते.


क्रांती सेना निवडणुकीतून बाहेर

राज्यातील १५ जागांवर महाराष्ट्र क्रांती सेनेनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं हा त्यामागचा उद्देश होता. हा प्रश्न राज्य सरकारनं सोडवल्याने क्रांती सेना निवडणूक लढवण्याऐवजी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याची घोषणा महाराष्ट्र क्रांती सेनेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केली. सरकारकडून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. यावर न्यायालयाकडूनही स्थगिती आलेली नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रांती सेना महायुतीत सहभागी होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.


अर्ज मागे घेणार

महाराष्ट्र क्रांती सेनेनं लोकसभेसाठी आपले उमेदवार दिले होते. त्यांचे अर्ज मागे घेण्यात येणार असल्याचं आश्वासनही यावेळी देण्यात आलं. तसंच मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण कायद्याच्या कसोटीत टिकणारं असल्याचं सांगत आम्ही आपल्या शब्दावरून मागे फिरणार नसल्याचं आश्वासनही महायुतीकडून मराठा समाजाला देण्यात आलं.
हेही वाचा -

शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज, काँग्रेसच्या ‘न्याय’ला भाजपाचं संकल्पपत्रातून उत्तर

माझ्यावरील आरोप निराधार; उर्मिला मातोंडकरचं स्पष्टीकरणसंबंधित विषय
ताज्या बातम्या