Advertisement

शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज, काँग्रेसच्या ‘न्याय’ला भाजपाचं संकल्पपत्रातून उत्तर

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्याची घोषणा करत गरीबांसाठी ‘न्याय’ योजना लागू करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर सोमवारी भाजपानं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.

शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज, काँग्रेसच्या ‘न्याय’ला भाजपाचं संकल्पपत्रातून उत्तर
SHARES

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्याची घोषणा करत गरीबांसाठी ‘न्याय’ योजना लागू करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर सोमवारी भाजपानं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपाकडून या जाहीरनाम्याला संकल्पपत्र असं नाव देण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत संकल्पपत्राचं अनावरण करण्यात आलं.


७५ संकल्प पूर्ण करणार

२०२२ सालापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या संकल्पपत्रातील ७५ संकल्प पूर्ण करण्याचं आश्वासन यावेळी भाजपाकडून देण्यात आलं. गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनाम्याची समिती तयार करण्यात आली होती. तसंच यासाठी ७ हजार ५०० सुचनापेट्या, शेकडो रथ आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सर्व स्तरातून सूचना मागवण्यात आल्या होत्या.


'संकल्पपत्रा'तील महत्वाचे मुद्दे


  • १ लाखापर्यंतच्या कृषी कर्जावर ५ वर्षांपर्यंत कोणतेही व्याज नाही
  • सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार
  • दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी लागू करणार
  • सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये देणार
  • सर्व शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा फायदा मिळणार
  • छोट्या शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करणार
  • राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार 
  • छोट्या व्यापाऱ्यांना पेंशन देणार
  • प्रत्येक घरात वीज, शौचालय पोहोचवणार
  • तिहेरी तलाक विरोधात कठोर कायदा आणणार
  • सिटीजनशीप विधेयक लागू करणार
  • समान नागरी कायदा लागू करणार













Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा