Advertisement

माझ्यावरील आरोप निराधार; उर्मिला मातोंडकरचं स्पष्टीकरण

हिंदू धर्मावर आपला विश्वास असून हिंदू धर्माचा मी आदर करते. आपल्यावरील आरोप निराधार असून आपल्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीला कोणताही आधार नसल्याचा दावा, काँग्रेसच्या उत्तर मुंबईची उमेदवार उर्मिला मातोंडकर हिनं केला.

माझ्यावरील आरोप निराधार; उर्मिला मातोंडकरचं स्पष्टीकरण
SHARES

हिंदू धर्मावर माझा विश्वास असून हिंदू धर्माचा मी आदर करते. त्यामुळेच माझ्यावरील आरोप निराधार असून माझ्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीला कोणताही आधार नसल्याचा दावा, काँग्रेसची उत्तर मुंबईची उमेदवार उर्मिला मातोंडकर हिनं केला. उर्मिला मातोंडकरविरोधात पवई पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावर तिनं स्पष्टीकरण देत आपली भूमिका मांडली.


हिंदूंच्या भावना दुखावल्या

उर्मिला मातोंडकरनं काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  काँग्रेसनं तिला उत्तर मुंबईतून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर एका वृत्तवाहिनीनं तिची मुलाखत घेतली होती. त्यावेळी एका उत्तरादरम्यान तिनं हिंदू धर्म हा सर्वाधिक हिंसाचारी धर्म असल्याचं वक्तव्य केलं होतं. तिच्या या वक्तव्यातून हिंदूंच्या भावना दुखावल्याचं सांगत भाजपाचे प्रवत्ते सुरेश नाखवा यांनी तिच्याविरोधात पवई पोलीस ठाण्यात लेखी अर्ज दिला आहे. तिच्या वक्तव्यामुळं हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या असून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून त्यांनी असं वक्तव्य केल्याचं या अर्जात म्हटलं आहे. तसंच उर्मिलाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.


उमेदवारी रद्द करावी

हिंदू धर्माविरोधात उर्मिला मातोंडकरनं केलेल्या वक्तव्यानंतर तिची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी एका व्यावसायिकानं निवडणूक आयोगाकडं केली आहे. चैतन्य जोशी असं या व्यावसायिकाचं नाव आहे. निवडणूक आयोगानंही त्याच्या तक्रारीची दखल घेतली असून योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे.




हेही वाचा -

शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज, काँग्रेसच्या ‘न्याय’ला भाजपाचं संकल्पपत्रातून उत्तर

टीव्ही मालिकांमधून भाजपचा प्रचार, काँग्रेस करणार तक्रार



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा