Advertisement

मोबाईल तिकीटावर प्रवाशांना मिळणार ५ टक्के सूट

पश्चिम रेल्वे प्रशासनानं मोबाइल तिकिटांसाठी आर. वॉलेट रिचार्जवर ५ टक्के सूट देण्याच्या निर्णयाला ६ महिन्यांसाठी मुदतवाढ दिली.

मोबाईल तिकीटावर प्रवाशांना मिळणार ५ टक्के सूट
SHARES

पश्चिम रेल्वेनं प्रवास करण्यासाठी मोबाईल तिकीट सुविधेचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. कारण आता, पश्चिम रेल्वे प्रशासनानं मोबाइल तिकिटांसाठी आर. वॉलेट रिचार्जवर ५ टक्के सूट देण्याच्या निर्णयाला ६ महिन्यांसाठी मुदतवाढ दिली. त्यामुळं मोबाईल तिकीट सुविधेचा वापर करणाऱ्या प्रवाशांना २४ ऑगस्टपर्यंत आर. वॉलेट रिचार्जच्या रकमेवर ५ टक्के वाढीव रक्कम मिळणार आहे.


५ टक्के अतिरिक्त बोनस

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीटसाठी स्थानकातील तिकीट खिडक्यांवरील रांगेत उभं राहायला लागू नये यासाठी रेल्वे प्रशासनानं मोबाईल तिकीट सुविधा उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणं या सुविधेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळावा तसंच, तिकीट मिळविण्यासाठी मोबाइल तिकिटांचा वापर वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासनानं वॉलेट रिचार्जवर ५ टक्के अतिरिक्त सूट देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 


प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

लोकल तिकीटसाठी स्मार्ट कार्ड, एटीव्हीएम, जेटीबीएस देखील प्रवाशांसाठी उपलब्ध असून, त्यासाठी यूटीएस अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्या धारकांची संख्या १२ लाख ५४ हजारांवर पोहोचली आहे. त्यानुसार, २०१८-१९ मध्ये ५४ लाख १० हजार मोबाइल तिकिटांची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ही योजना संपुष्टात येणार होती. मात्र, प्रवाशांचा मोबाईल तिकीट सुविधेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यानं पश्चिम रेल्वेनं या योजनेला ६ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.



हेही वाचा -

माझ्यावरील आरोप निराधार; उर्मिला मातोंडकरचं स्पष्टीकरण



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा