10 जुलैपर्यंत मंत्री मंडळाचा विस्तार होण्याची शक्यता

अजित पवार यांनी राष्ट्रवादीसोबत बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकाररच्या सरकारमध्ये सहभागी झाले. रविवारी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी देखील शपथ घेतली. आता नवीन मंत्री पक्षात आल्याने लवकरच मंत्रिमंजळाचा विस्तार करण्यात येणार आहे. 

10 जुलैपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. पण मंत्रिमंडळात किती जणांची वर्णी लागले हे पाहणे औसुक्याचे ठरेल. मंत्रिमंडळात एकूण 44 जागा आहेत. त्यापैकी २९ जागांवर वर्णी लागली आहे. तर उरलेल्या 14 जागांबाबत लवकरच निर्णय होईल.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनेकदा दिल्लीवाऱ्याही झाल्या. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय लांबणीवरच पडला. अखेर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूशखबर दिली आहे. “देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचे अनेक प्रश्न असतात. त्यासंदर्भात दिल्लीला जाऊन भेट घ्यावी लागते, त्याचा पाठपुरावा करावा लागतो. अनेकवेळा त्यासंदर्भातील बैठकाही असतात. आम्हाला मंत्रिमंडळ विस्तारही करायचा आहेच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याबाबत निर्णय घेतीलच. मला वाटतं जुलै महिन्यात आम्ही विस्तार करू.केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा आपआपसात काहीही संबंध नाही. केंद्राचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे आम्हाला माहितीही नाही. आम्हाला राज्याच्या विस्तारात जास्त रस आहे.”


हेही वाचा

राज आणि उद्धव ठाकरेही एकत्र येणार? शिवसेना भवनासमोर लागले पोस्टर

सत्तेच्या खेळावर राज ठाकरे कडाडले, उपस्थित केले अनेक प्रश्न

पुढील बातमी
इतर बातम्या