Advertisement

राज आणि उद्धव ठाकरेही एकत्र येणार? शिवसेना भवनासमोर लागले पोस्टर

अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्याने पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज आणि उद्धव ठाकरेही एकत्र येणार? शिवसेना भवनासमोर लागले पोस्टर
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्या सरकारमधील सहभागावर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत. एकीकडे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

दुसरीकडे सर्वसामान्य जनता राजकारणावर टीका करत आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या पक्षात एकीकडे राज्यात नवे राजकीय समीकरण तयार झाले आहे, तर दुसरीकडे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचे आवाहन केले जात आहे.

शिवसेना भवनासमोर पोस्टर लावून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पोस्टरवर एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेना भवन परिसरात हे बॅनर लावले आहेत.


मनसैनिक लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले असून, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे अशी साद घालण्यात आली आहे. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासह राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. 

"महाराष्ट्राच्या राजकरणाचा चिखल झाला, राजसाहेब - उद्धवसाहेब आता तरी एकत्र या. संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे. एका महाराष्ट्रसैनिकाची हात जोडून कळकळीची विनंती," असं लक्ष्मण पाटील यांनी या बॅनरवर लिहिलं आहे. 

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापन केली होती. यानंतर अनेकांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत यासाठी प्रयत्न केले होते.

पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनीही यांनी वारंवार ठामपणे नकार दिला आहे. पण आता अजित पवारांमुळे पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र यावेत यासाठी आवाहन केलं जात आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा