भाजपची ‘पोलखोल’ करण्यापेक्षा.., प्रविण दरेकर यांचा सचिन सावंत यांना टोला

भाजपाची (bjp) पोलखोल करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मराठा आरक्षण कसं मिळेल याचा सल्ला महाविकास आघाडी सरकारला द्या, अशा शब्दांत भाजप नेते प्रविण दरेकर यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना टोला हाणला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपला लक्ष्य करणारे सचिन सावंत यांना प्रविण दरेकर यांनी तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. ज्यांच्यासाठी बाजू मांडताय त्यांची आता एवढी लाज निघालीय ना मराठा आरक्षणाबाबत. सचिन सावंतजी थोडं मुंबईच्या चकचकीत दुनियेतून बाहेर निघून फिरा महाराष्ट्रात... कळेल. 'पोलखोल' च्या नादात स्वपक्षाची आणि महाविकास आघाडीचीच लक्तरं तुम्ही वेशीवर टांगत आहात!

हेही वाचा- दारू अवैध विकली जाते म्हणून बंदी उठवणं तर्कहीन- सुधीर मुनगंटीवार

बाकी विषय भरकटवण्यात तुम्ही, काँगेस (congress) आणि तुमचे सहकारी पक्ष यांचा हात कुणी धरू शकणार नाही. भाजपाची पोलखोल करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मराठा आरक्षण कसं मिळेल याचा सल्ला सरकारला द्या. 

राहता राहिला प्रश्न 'पोलखोलचा' तर... महाविकास आघाडीचा मराठा आरक्षण न देण्याचा 'नियोजनबद्ध दुर्लक्षपणाचा बुरखा' आपल्या पोलखोलीनंतर मराठा बांधव आणि महाराष्ट्रासमोर आम्हीच टराटरा फाडू!, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

तर, एके ठिकाणी मराठा आरक्षण मिळाले पाहिजे असा देखावा करायचा व दुसरीकडे आपल्याच कार्यकर्त्यांना न्यायालयात विरोध करायला सांगायचें? भाजपनेच मराठा आरक्षणाविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवली का? अनुप मरार कोण आहे? संघ कनेक्शन काय? याचं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील व फडणवीस यांनी द्यावं, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

(pravin darekar slams sachin sawant on maratha reservation)

हेही वाचा- मुंबईत ५० टक्के लसीकरणानंतरच पूर्ण अनलाॅक- अस्लम शेख

पुढील बातमी
इतर बातम्या