Advertisement

मुंबईत ५० टक्के लसीकरणानंतरच पूर्ण अनलाॅक- अस्लम शेख

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी मुंबईतील स्थितीवर महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे.

मुंबईत ५० टक्के लसीकरणानंतरच पूर्ण अनलाॅक- अस्लम शेख
SHARES

येत्या १ जून पासून मुंबईसह महाराष्ट्रात लाॅकडाऊन सुरूच राहणार की नाही? निर्बंधांमध्ये नेमकी किती सवलती मिळणार?, कुणाला दिलासा मिळणार, कुणाला नाही? असे एक ना अनेक प्रश्न सध्या राज्यातील जनतेला सतावत आहेत. त्यातच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी मुंबईतील स्थितीवर महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अस्लम शेख (aslam shaikh) यांनी मुंबईत अनलाॅक नेमकं केव्हा करता येऊ शकतं, याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले, सध्याच्या घडीला पूर्णपणे अनलाॅक करण्याचा प्रश्नच उद्धवत नाही. कारण आजही महाराष्ट्रात ५० हजारांहून अधिक रुग्ण हे आॅक्सिजन बेडवर आहेत. पण कोरोनाबाधितांची संख्या नक्कीच कमी झाली आहे. अमेरिकेत ९५ टक्क्यांहून जास्त लोकांचं लसीकरण पूर्ण झाल्याने बहुतेकजण आता मास्कविना फिरत आहेत. त्यासाठी आपल्याकडेही लवकरात लवकर लसीकरण पूर्ण झालं पाहिजे. 

हेही वाचा- कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून २.५ कोटींचा दंड वसूल, नवी मुंबई पालिकेची कारवाई

महापालिकेने (bmc) लसींच्या खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढलं आहे. त्याला स्पुटनिक आणि इतर काही पुरवठादारांचा प्रतिसाद मिळाला. परंतु आणखी कंपन्या त्यात सहभागी व्हाव्यात म्हणून टेंडरची मर्यादा आपण वाढवली आहे. केंद्रानेही परदेशी कंपन्यांशी संवाद साधायला हवा. त्यामुळे जोपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रात ५० टक्क्यांहून जास्त लोकांचं लसीकरण पूर्ण होण्याआधीच लाॅकडाऊन काढून घेणं कोरोना विषाणू प्रसाराला स्वत:हून आमंत्रण देण्यासारखं आहे, असं अस्लम शेख म्हणाले.

राहीला प्रश्न उद्योगधंद्यांना दिलासा देण्यासाठी लाॅकडाऊन सुरू असतानाच आपल्याला काय करता येईल यावर विचारविनिमय सुरू आहे. मग याअंतर्गत हॉटेल इंडस्ट्री, सलून, हार्डवेअर, इलेक्ट्राॅनिक्स व्यावसायिक यांना दुकानं उघडण्यास आपल्याला सवलत देता येऊ शकेल. कपड्याची दुकानं उघडता येतील का? किंवा अत्यावश्यक सेवेतील दुकांनाची व्याप्ती वाढवून इतर व्यवसायांना त्यात सामावून घेता येऊ शकेल का? कुठल्या सेवा सुरू करायच्या, कुठल्या सेवांची वेळ वाढवायची ? यावर राज्याची टास्क फोर्स निर्णय घेईल. त्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल, मगच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असंही अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं.

(more than 50 percent covid 19 vaccination needed for full unlock in maharashtra says aslam shaikh)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा