Advertisement

धारावीत बुधवारी कोरोनाचे अवघे ३ नवे रुग्ण

मुंबईत (mumbai) आता कोरोनाचा (coronavirus) फैलाव आटोक्यात आल्याचं दिसून येत आहे. दैनंदिन रुग्णांची संख्या घटत चालली आहे.

धारावीत बुधवारी कोरोनाचे अवघे ३ नवे रुग्ण
SHARES

मुंबईत (mumbai) आता कोरोनाचा (coronavirus) फैलाव आटोक्यात आल्याचं दिसून येत आहे. दैनंदिन रुग्णांची संख्या घटत चालली आहे. बुधवारी मुंबईत १ हजार ३६२ नवीन रुग्ण आढळले.  तर १ हजार २१ रुग्ण बरे झाले आहेत. सर्वात मोठा दिलासा म्हणजे धारावी (dharavi) मध्ये अवघे तीन रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील धारावीतील हा निचांक ठरला आहे. 

मुंबईत रोज रुग्णसंख्या एक हजार जे दीड हजारपर्यंत आली आहे. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी होत आहे. मंगळवारी ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  यामधील २५ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. १६ रुग्ण पुरुष तर १८ रुग्ण महिला होत्या. मृतांमध्ये ४० वर्षांखालील ४ जण, ४० ते ६० वयोगटातील १२ जण तर १८ जण ६० वर्षांवरील होते. आतापर्यंत मुंबईत १४ हजार ७४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

मुंबईत सध्या २७ हजार ९४३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईतील रिकव्हरी रेट ९४ टक्क्यांवर पोहचला आहे. तर रुग्णवाढीचा दर ०.१९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी सध्या ३४८ दिवस इतका आहे.

मुंबईत सध्या ५३ कंटेनमेंट झोन असून २१७ इमारती आणि ४७१७ इमारतींचे भाग-मजले सील आहेत. या ठिकाणी २ लाख ९३ हजार घरांमध्ये ११ लाख ७७ हजार रहिवासी प्रतिबंधात आहेत.



हेही वाचा -

हार्डवेअर, छत्र्या-रेनकोटची दुकानं सुरू राहणार, राज्य सरकारचा निर्णय

MPSC पोलीस उपनिरीक्षक भरतीतील शारीरिक परीक्षेच्या निकषांमध्ये बदल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा